Sambhajinagar News : कांदा, लिंबू आणि लसणाचे दर तेजीत.. file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कांदा, लिंबू आणि लसणाचे दर तेजीत..

बाजार समितीत कांदा, लिंबू आणि लसणाचे दर अद्यापही चढेच असल्याने स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Prices of onions, lemons, and garlic are soaring

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीत कांदा, लिंबू आणि लसणाचे दर अद्यापही चढेच असल्याने स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. मात्र, भाजीपाल्याची आवक वाढल्याने शहरातील किरकोळ बाजारात अनेक भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. यात टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, भोपळा आणि काकडीच्या दरात किलोमागे १० ते २० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महागाईचा सामना करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जाधववाडी भाजीमंडईतील घाऊक बाजारात कांदा, लिंबू आणि लसणाचे दर अद्यापही तेजीत आहेत. त्यामुळे गृहिणींना स्वयंपाकघराचे बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून, त्याचा परिणाम किरकोळ बाजारात दिसून येत आहे.

औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज, टीव्ही सेंटर आणि मुकुंदवाडी येथील बाजारांत टोमॅटोचे दर ५० रुपयांवरून ४० रुपये किलोवर आले आहेत. तसेच भोपळ्याचे दर ६० रुपयांवरून ४० रुपये, काकडीचे दर ६० रुपयांवरून ५० रुपये, तर वांग्याचे दर ८० रुपयांवरून ६० रुपये किलो झाले आहेत. कोबी आणि फ्लॉवरच्या दरातही प्रत्येकी २० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे कोबी ४० रुपये, तर फ्लॉवर ६० रुपये किलोने विकले जात आहे.

आल्याचे दरही २४० रुपयांवरून २०० रुपये किलोवर आले आहेत. दुसरीकडे, बटाट्याचे दर ३० रुपये, तर कांद्याचे दर ६० रुपये किलो आहेत. भेंडी, गाजर, कारले, वाल, गिलके, हिरवी मिरची, सिमला मिरची आणि दोडके ८० रुपये किलोने विकले जात आहेत.

दिलपसंद १०० रुपये, शेवगा आणि श्रावण घेवडा १२० रुपये, तर कंटुले २०० रुपये किलोने विकले जात आहेत. लिंबाचे दर २०० रुपये किलो असून, लसणाला २०० ते ४०० रुपये किलो भाव मिळत आहे. पालेभाज्यांचे दर स्थिरपालेभाज्यांची आवक वाढल्याने त्यांच्या दरातही फारसा बदल झालेला नाही. मेथी, चुका, पालक, तांदुळजा आणि शेपू प्रत्येकी १५ रुपये जुडी, तर कोथिंबीर २० रुपये जुडीने उपलब्ध आहे.

एकूणच, बहुतांश भाज्यांचे दर स्थिर किंवा कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळत असला, तरी काही मोजक्या भाज्यांचे चढे दर कायम आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT