Asaduddin Owaisi : एसआयआरच्या आड एनआरसीची तयारी file photo
छत्रपती संभाजीनगर

Asaduddin Owaisi : एसआयआरच्या आड एनआरसीची तयारी

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीमे राबविल्यानंतर केंद्रातील भाजप सरकार देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मोहीम राबवून राष्ट्रीयत्व हिरावून घेणार, असा आरोप एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅ. असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी (दि. १) पत्रकार परिषदेत केला.

पुढारी वृत्तसेवा

Preparations for NRC under the guise of SIR

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीमे राबविल्यानंतर केंद्रातील भाजप सरकार देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मोहीम राबवून राष्ट्रीयत्व हिरावून घेणार, असा आरोप एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅ. असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी (दि. १) पत्रकार परिषदेत केला. त्यासोबतच प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत आहे का हे तपासण्याचे आवाहनही केले. एमआयएम पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्ताने ते जिल्हा दौऱ्यावर आले होते.

खा. बॅ. ओवेसी हे शहरात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम एमआयएम पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले देशात सध्या एसआयआरची मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत छोट्या-छोट्या कारणांवरून नागरिकांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला. आरएसएस आणि भाजपचे नेत्यांनीच एसआयआर मोहीम सुरू केली आहे. आसाम, बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये एसआयआर राबवून मोठ्याप्रमाणात मतदार कमी केले.

एमआयएमने सुरुवातीपासूनच एसआयआरवर आक्षेप घेत सनदशीर मार्गाने विरोध केला आहे. न्यायालयात याचिका दाखल करण्यासह नागरिकांना एसआयआर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही पक्षाने केले, त्यासाठी एमआयएमने स्वतंत्र अॅपदेखील तयार केल्याचे त्यांनी सांगितले. आरएसएसच्या एका नेत्याने एसआयआरची मागणी केली. ही मागणी म्हणजेच पुढे एसआयआरनंतर सरकार देशभरात एनआरसी मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे.

एसआयआर म्हणजेच एनआरसीची बॅकडोअर एन्ट्री असल्याचाही आरोप त्यांनी केला. सीजेपी, इंडिया आघाडीच्या आंदोलनावर ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. समान नागरी कायदा (यूसीसी) म्हणजे 'कट-पेस्ट' असल्याची टीका करत, त्यामागे देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची मानसिकता असल्याचा आरोप त्यांनी केला.

आयुक्तांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळणे आणि आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदींवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली नियुक्त्या होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तुम्ही कोणामुळे हरलात ?

निवडणुकीनंतर सतत काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष हे एमआयएममुळे हरलो, असाच दावा करीत होते. परंतु, आता तेच लोक वोट चोरीमुळे आम्ही हरलो, असे म्हणत आहे. त्यामुळे तुम्ही नेमके कशामुळे हरला ते अगोदर सांगा, असा खोचट टोला खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला. उत्तर प्रदेश निवडणुकीत सन्मानाने सोबत घेतल्यास इंडिया आघाडीत जाऊ, असेही ते म्हणाले-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT