Pre-monsoon work : मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग, शहरातील ७५ टक्के काम पूर्ण File Photo
छत्रपती संभाजीनगर

Pre-monsoon work : मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग, शहरातील ७५ टक्के काम पूर्ण

उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न : महापालिका आयुक्तांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Pre-monsoon drain cleaning gathers momentum; 75% of work completed in the city.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग दिला असून आगामी आतापर्यंत सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नालेसफाईचे कामही मान्-सूनपूर्व पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि.२२) पत्रकारांशी बोलताना दिली.

मान्सूनपूर्व नाले सफाईच्या कामाला महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे महिनाभरापासून शहरातील विविध भाागातील नाले सफाईचे काम सुरू आहे. पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी महापालिकेकडून यंदा शहरातील सर्व दहा झोनमध्ये सूक्ष्म नियोजन करून नालेसफाईच्या कामे केली जात आहेत.

उनी भिनगर मानगरपालिका छत्रपती संभाजीनगर कामांची पाहणी करणार असल्याचे आतापर्यंत ७५ टक्के नाले सफईची कामे पूर्ण झाली असून पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची माहिती शुक्रवारी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. तसेच या कामांसह सुरू असलेल्या त्यांनी यावेळी सांगितले.

शहरातील नाले सफाईच्या कामांसाठी मनपाचे व खासगी मिळून ८ पोकलेन, १२ जेसीबी आणि १० टिप्पर व १० ट्रॅक्टरद्वारे काम केले जात आहे. यात नाल्यांमध्ये पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणांची प्राधान्याने सफाई केली जात आहे.

गाळ आणि कचरा काढण्याच्या कामांनाही गती देण्यात आली आहे. मान्सूनपूर्व सर्व कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असून उर्वरित नालेसफाईची कामे येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचेही आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT