Sambhajinagar News : लाखो रुपये खर्चुनही बसस्थानकात खड्डे कायम file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : लाखो रुपये खर्चुनही बसस्थानकात खड्डे कायम

धुळीमुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

Potholes persist at the bus station despite spending lakhs of rupees

संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्य बसस्थानकातील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी एसटी प्रशासनाने ७ लाख ९८ हजार ८०० रुपये खर्चुन ठेकेदारांकडून बसस्थानकांच्या पार्किंग एरियाचा पूर्ण परिसर समतल करून खड्डे बुजवण्यासह दबईचे काम पूर्ण केल्याचे विभागीय अभियंता स्थापत्य विभागाने सांगितले. काम पूर्ण झाले मात्र खड्डे कायम असून योग्य दबई न झाल्याने बसस्थानक परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुख्य बसस्थानकातील खड्डे बुजवण्यासाठी आगारप्रमुखांनी १८ ऑगस्ट रोजी विभाग नियंत्रकांकडे कामाचे अंदाजपत्रक पाठवले. विभाग नियंत्रकांने १९ ऑगस्ट रोजी प्रशासकीय मान्येतेनुसार ७ लाख ९८ हजार ८०० रुपयांची मंजुरी दिली. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला २ सप्टेंबर रोजी स्थापत्य विभागाने कायदिश दिले.

त्यात बसस्थानकातील खड्डे जेसीबीने समतल करणे, ४० व ८० एमएम जीएसबी या मटेरियलचा वापर करून खड्डे भरणे, नंतर मेटल चुरी व पाणी वापरून दबई आदी कामांचा समावेश आहे. दरम्यान पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी सोमवारी (दि.१२ ऑक्टोबर) स्थापत्य विभागाच्या विभागीय अभियंता मुख्य बसस्थानकावर आले होते. त्यावेळी त्यांच्यांशी संपर्क साधला असता हे काम निवेदेनुसार आणि दिलेल्या अटीनुसार पूर्ण झाल्याची माहिती दिली.

बसस्थानकात खड्डे मात्र कायम

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारांवरच मोठे खड्डे आढळून आले तर काही ठिकाणी खडी बरोबरच सिमेंटचे बसेसना अडचणींचा सामना करत प्रवेश करावा लागत आहे. तर खडी अंथरलेल्या ठिकाणी योग्य प्रकारे दबई झाली नसल्याने बसस्थानक परिसरात बस जाताना मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. खडीच्या धुळीकणांमुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काम पूर्ण होऊन दोन दिवसही झाले नाही तरीही खडीची धूळ उडत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

चौकशीची मागणी

तब्बल ७ लाखांपेक्षाही जास्त पैसे मोजून अशा प्रकारचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अभय दिला जात असल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या संपूर्ण कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी आणि प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर तसेच त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT