Polio Vaccination Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Pulse Polio Vaccination Campaign : दोन लाख बालकांना पोलिओचे कवच

६९२ बूथवर होणार लसीकरण; उर्दू भाषेतही जनजागृतीवर भर

पुढारी वृत्तसेवा

Polio protection for two lakh children

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत येत्या २८ जून रोजी शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १ लाख ९९ हजार ५६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका आरोग्य विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असून शहरभर धडक नियोजन करण्यात आले आहे.

मोहिमेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महापालिकेकडून सर्व पालकांना आपल्या बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिओमुक्त भारताचे उद्दिष्ट कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी शहरातील विमानतळ, रेल्वे स्थानक, बसस्थानके आणि प्रमुख पर्यटनस्थळांवर विशेष बूथ उभारण्यात येणार आहेत. प्रवासात असलेल्या तसेच स्थलांतरित कुटुंबांतील बालकांसाठीही याद्वारे लस देण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलिओ मोहिमेचा संदेश सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी महापालिकेने यंदा प्रथमच उर्दू भाषेतही जनजागृतीपर आवाहन प्रसिद्ध केले आहे. विविध माध्यमांतून प्रसिद्धी करून मोहिमेला शंभर टक्के प्रतिसाद मिळविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

मोहिमेचे संपूर्ण नियोजन एका नजरेत

लसीकरण बूथ : शहरात एकूण ६९२ लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत.

युक्त यंत्रणा : ४० आरोग्य केंद्रे, ४१ रिपोर्टिंग युनिट, ४३ वैद्यकीय अधिकारी, २ हजार ५० पीपीआय कर्मचारी आणि १४० प्रवेशक कार्यरत राहणार आहेत.

घरोघरी भेट : मोहिमेदरम्यान शहरातील ३ लाख ६७ हजार २६० घरांपर्यंत पोहोचून पात्र बालकांना पोलिओ डोस देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT