पोलिसांना मिळणार अतिरिक्त वेतनवाढ Pudhari
छत्रपती संभाजीनगर

पोलिसांना मिळणार अतिरिक्त वेतनवाढ

औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल

पुढारी वृत्तसेवा

Police to receive an additional salary hike

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ज्या पोलिस किंवा इतर कर्मचाऱ्यांना २४ ऑगस्ट २०१७ पूर्वी उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार किंवा प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांना अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शासनाचा २०१७ यासंदर्भातील निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांच्या खंडपीठासमोर झाली. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, २४ ऑगस्ट २०१७ रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना या तारखेच्या आधी उत्कृष्ट कामाची प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांचे हक्क अबाधित राहतील.

पंडित उत्तम भावसार आणि इतर पोलिस दलातील कर्मचारी याचिकाकर्त्यांनी अॅड. विष्णू बी. मदन पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी शासनाकडून अतिरिक्त वेतनवाढ नाकारली गेल्याच्या विरोधात दाद मागितली होती. यावर सुनावणी करताना, न्यायालयाने प्रशासनाला आदेश दिले आहेत.

याचिकाकर्ते हे खरोखरच जिल्हा पुरस्कार विजेते आहेत का, याची खातरजमा करावी. त्यांना उत्कृष्ट कामाचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, अतिरिक्त वेतनवाढीच्या तरतुदीनुसार त्यांच्या प्रकरणाचा विचार करावा, ही संपूर्ण प्रक्रिया पुढील सहा महिन्यांच्या आत पूर्ण करून निर्णय घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT