Gas Agenciy : गॅस एजन्सींजवर लागला पोलिस बंदोबस्त File photo
छत्रपती संभाजीनगर

Gas Agenciy : गॅस एजन्सींजवर लागला पोलिस बंदोबस्त

गर्दीमुळे वाद होण्याच्या भीतीने वितरकांनी केली होती मागणी

पुढारी वृत्तसेवा

Police security has been deployed at gas agencies

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गॅस टंचाईच्या झळा कमी होत नसल्याने घरगुती सिलिंडरसाठी बुकिंगनंतर वेटिंग लिस्ट वाढतच आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागत असल्याने वाद होण्याच्या भीतीने एजन्सीचालकांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी काही एजन्सींजवर पोलिस बंदोबस्तात गॅस वितरण होत असल्याचे दिसून आले.

मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती गॅसची कमतरता भासू नये म्हणून व्यावसायिक गॅस सिलिंडर लगेच रोखण्यात आला होता. मात्र, यानंतर दहा ते बारा दिवस उलटूनही गॅसचा विस्कळीत पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यात ऑनलाईन बुकिंगचा बोजवारा आणि वाढत जाणारी वेटिंग लिस्ट यामुळे ग्राहक अधिकच पॅनिक होत आहे.

विविध तक्रारी घेऊन एजन्सींवर धडकत असल्याने गर्दी वाढत आहे. त्यात घरगुती गॅससाठी नियमित होणारा पुरवठा काही प्रमाणात कमी झाल्यामुळे ग्राहकांच्या रांगा लागून वाद होण्याच्या भीतीने संभाव्य धोका लक्षात घेत एजन्सीधारकांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी काही एजन्सींवर १ किंवा २ पोलिस दिसून आले. मात्र, एजन्सींवर ग्राहकांची गर्दी तुरळक दिसली.

या एजन्सींजवर पोलिस बंदोबस्त

शहरात विविध भागांत एकूण २५ गॅस वितरक आहेत. त्यापैकी सिडको भागातील तीन गॅस एजन्सीवर पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. यांसह उल्कानगरी, समर्थनगर, जुनाबाजार येथील एजन्सीवरही पोलिस कर्मचारी तैनात केले आहे. इतर एजन्सीवर गर्दी कमी होती. गर्दी वाढल्यास कळवा, तत्काळ येऊ असे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT