फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या सावंगी शिवारातील पुनम हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या एका जुगार अड्यावर पोलिसांनी धाड टाकून २४ आरोपीच्या ताब्यातून नगदी एक लाख ६३ हजार रुपये, सहा मोटारसायकल, एक चार चाकी, मोबाईलसह एकूण बारा लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सावंगी शिवारातील छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गालगत असलेल्या पूनम ढाब्याच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याचे माहिती अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयास मिळाली.
त्यावरून अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाचे पथक व फुलंब्री पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि. २९) रोजी रात्री आठ वाजता पूनम ढाब्याच्या पाठीमागे अचानक धाड टाकण्यात आली असता त्या ठिकाणी पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळताना २४ आरोपी आढळून आले. त्यांच्या ताब्याततून नगदी रोख एक लाख ६३ हजार रुपये, २४ मोबाईल, सहा मोटार सायकली, एक चार चाकी व जुगार साहित्य असा एकूण बारा लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून २४ जणांविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार रात्री गुन्हा दाखल प्रकिया सुरू होती.
गुलशेर खान, सय्यद नविद अली, संदीप हिवराळे, महेंद्र जैन, सलीम पठाण, विशाल कृष्णा जाधव, विजय सुपेकर, चंदन पगडे, योगेश पिठोरे, अभिमन्यू पाहाडिया, सदानंद चापलोत, दिगंबर गाडेकर, राजू बटावडे, शेख गुलाम शेख हमीद, आकाश मगरे, शिवाजी चालगे, शेख भिकन शेख रहीम, सोमनाथ श्रीरंग, संदीप बोराडे, रियाज शेख, समीर शेख, राजेश विशिस्ट, नवीन बशरकर, शेख राजमहंमद जमीर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.