Police Transfers News : पोलिस दलात खांदेपालट; चिकलठाणा, खुलताबाद, फुलंब्रीला नवे प्रभारी (File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Police Transfers News : पोलिस दलात खांदेपालट; चिकलठाणा, खुलताबाद, फुलंब्रीला नवे प्रभारी

ग्रामीण पोलिस दलातील पाच पोलिस निरीक्षक आणि एका सहायक निरीक्षकाची (एपीआय) प्रशासकीय कारणास्तव आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बदली करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

Police Force Transfers: New Officers-in-Charge for Chikalthana, Khultabad, and Phulambri

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण पोलिस दलातील पाच पोलिस निरीक्षक आणि एका सहायक निरीक्षकाची (एपीआय) प्रशासकीय कारणास्तव आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बदली करण्यात आली. अधिकाऱ्यांचा विहित कालावधी पूर्ण झाल्याने पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवारी (दि. १३) बदलीचे आदेश जारी केले आहेत. चिकलठाणा, खुलताबाद, फुलंब्रीला नवे प्रभारी मिळाले आहेत.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्याकडे चिकलठाणा पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला. पोलिस कल्याण शाखेचे प्रशांत महाजन यांच्याकडे खुलताबाद ठाण्याची धुरा देण्यात आली आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी रविकिरण दरवडे यांची सायबर ठाण्यात बदली झाली आहे. खुलताबादचे प्रभारी धनंजय फराटे यांची पोलिस कल्याण शाखेत बदली करण्यात आली.

नियंत्रण कक्षातील एपीआय प्रताप नवघरे यांच्याकडे फुलंब्री ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फुलंब्री ठाण्याचे प्रभारी संजय सहाणे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. त्यांच्याकडे पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT