PNG Price Hike : पीएनजी दरवाढीने उद्योगांची केली आर्थिक कोंडी; दरात ३९ टक्के वाढ file photo
छत्रपती संभाजीनगर

PNG Price Hike : पीएनजी दरवाढीने उद्योगांची केली आर्थिक कोंडी; दरात ३९ टक्के वाढ

आखाती देशात भडकलेल्या युद्धाचा परिणाम इंधन दरांवर होत असून, या संघर्षामुळे पीएनजी (नैसर्गिक वायू) च्या दरात मोठी वाढ झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

PNG Price Hike Creates Financial Squeeze for Industries; 39% Increase in Rates

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आखाती देशात भडकलेल्या युद्धाचा परिणाम इंधन दरांवर होत असून, या संघर्षामुळे पीएनजी (नैसर्गिक वायू) च्या दरात मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे उद्योगांवर मोठा आर्थिक बोजा निर्माण झाला आहे. उद्योगांच्या मागणीच्या तुलनेत पीएनजी पुरवठा अपुरा असताना सुमारे ३९ टक्के दरवाढीने अनेक उद्योगांची आर्थिक कोंडी केली आहे.

अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक तणाव अद्यापही कायम आहे. यामुळे एलपीजी, पीएनजी पुरवठा बिस्कळीत होऊन किमतीत मोठी बाढ झाली आहे. याचा थेट परिणाम छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांवर होत आहे.

एलपीजी गॅस मिळत नाहीं, पीएनजीचे दर सुमारे ३९ टक्क्यांनी वाढल्याने आर्थिक बोजा निर्माण होऊन उत्पादन क्षमतेवर याचा परिणाम झाल्याचे उद्योजकांनी म्हटले आहे.

मागणी अधिक पुरवठा कमी

येथील औद्योगिक क्षेत्रात सुमारे ७००-८०० उद्योग हे गॅसवर चालणाऱ्या भट्टद्यांवर अवलंबून असून, रोज सुमारे ७२ मेट्रिक टन इतका गॅस या उद्योगांना लागत असताना, प्रत्यक्ष पुरवठा मात्र अपुरा पडत आहे. व्यावसायिक गॅसचे उत्पादन सध्या बंद आहे. मात्र, रुग्णालयांसह आवश्यक सेवा, संस्थांना सिलिंडरद्वारे गॅसचा पुरवठा सुरू आहे.

पीएनजी दरवाढीचा उद्योगांना फटका या काही दिवसांत पीएनजीचे दर सुमारे ३९ टक्क्यांनी वाढल्याने उद्योगांबर आर्थिक भार पडला आहे. यामुळे दैनंदिन खर्च आणि औद्योगिकतेवर याचा परिणाम होत आहे. पीएनजीचे बाडते दर लवकरच नियंत्रणात आले नाहीत तर, निश्चितच याचा मोठा आर्थिक फटका उद्योगांना बसणार आहे. - मिही
- मिहीर सौन्दलगेकर, मानद सचिव, सीएमआयए,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT