Sambhajinagar News : प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : १०० पदांना दिली एनओसी file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : १०० पदांना दिली एनओसी

छत्रपती संभाजीनगर विभागातील चार जिल्ह्यांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडून वेगवान हालचाली सुरू

पुढारी वृत्तसेवा

Path cleared for professor recruitment: NOC granted for 100 posts

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर विभागातील चार जिल्ह्यांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडून वेगवान हालचाली सुरू असून, या विभागाने आतापर्यंत २० संस्थांमधील १०० पदांच्या भरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले आहे. आचारसंहितेमुळे रखडलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेला आता वेग आल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांनी दिली.

या विभागाकडे ८४ महाविद्यालयांकडून ४७२ पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यांची छाननी करून सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या नियमांचे पालन करून त्यानुसार पात्र संस्थांना टप्प्याटप्प्याने ना हरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. १०५ पदांचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. ना हरकत प्रमाणपत्र मिळालेल्या संस्थांच्या रिक्त पदभरतीची प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण महिनाभरात उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सामाजिक, समांतर आरक्षणानुसार एनओसी चार जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या प्राध्यापक भरतीला गती देण्यात येत आहे. सामाजिक व समांतर आरक्षणाचे नियम तपासूनच संस्थांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. अचारसंहितेत अडकलेल्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. पंकजा वाघमारे, सहसंचालक उच्च शिक्षण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT