Chhatrapati Sambhajinagar News File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : भूसंपादनासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती, छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणाचा मार्ग मोकळा

रेल्वे प्रशासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यास विलंब झाल्याने छत्रपती संभाजीनगर ते परभरणी या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्न प्रलंबित पडला होता.

पुढारी वृत्तसेवा

Path cleared for Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway line

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा

रेल्वे प्रशासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यास विलंब झाल्याने छत्रपती संभाजीनगर ते परभरणी या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्न प्रलंबित पडला होता. नुकतेच दक्षिण मध्य रेल्वेने छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरणासाठी लागणारे भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मनमाड ते अंकाईपर्यंत दुहेरीकरणाचे रूळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले असून, अंकाई ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावरही करंजगावपर्यंत रूळ अंथरण्यात आले आहेत. करंजगावच्या पुढे छत्रपती संभाजीनगर मार्गावर सुमारे २२ ते २५ पुलांचे काम तसेच भर टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते परभणी या मार्गावरील दुहेरीकरणाचे काम भूसंपादनामुळे प्रलंबित पडले होते. त्याची अधिसूचना जारी करण्यात आल्यामुळे या मार्गावरील दुहेरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

करंजगाव-छत्रपती संभाजीनगर

करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील दुहेरीकरणासाठी लागणारी भर तसेच पुलांचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रूळ अंथरण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते परभणी भूसंपादनचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रियेत निधी वितरित करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

तीन जिल्ह्यांकडे जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर येथील भूसंपादनाची जाबाबदारी उपजिल्हाधिकारी (जमीन संपादन) जायकवाडी प्रकल्प यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर परभणी जिल्ह्यातील परभणी, मानवत व सेलू येथील जबाबदारी उपजिल्हाधिकारी (जमीन संपादन) जिल्हाधिकारी कार्यालय परभणी तर जालना, बदनापूर येथील जाबाबदारी उपविभागीय अधिकारी आणि जमीन संपादन अधिकारी जालना तर घनसावंगी येथील उपविभागीय अधिकारी आणि जमीन संपादन अधिकारी अंबड तसेच परतूर येथील जबाबदारी उपविभागीय अधिकारी आणि जमीन संपादन अधिकारी परतूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT