Peacock : पक्षाघात झालेला मोर उपचाराने सावरला file photo
छत्रपती संभाजीनगर

Peacock : पक्षाघात झालेला मोर उपचाराने सावरला

तीन दिवसांत नैसर्गिक अधिवासात परतण्यास सज्ज

पुढारी वृत्तसेवा

Paralyzed peacock recovers after treatment

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जालन्यातील अंबड तालुक्यातील चिकणगाव येथे जखमी व पक्षाघात झालेल्या अवस्थेत आढळलेल्या एका मोराला वनविभागाच्या तत्परतेमुळे नवीन जीवन मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील 'मॅनविथइंडिज फाऊंडेशन'च्या उपचार व पुनर्वसन केंद्रात अवघ्या तीन दिवसांच्या उपचारांनंतर हा मोर पूर्णपणे बरा झाला असून, त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

चिकणगाव परिसरात मोर गंभीर अवस्थेत असल्याची माहिती मिळताच वनरक्षक प्रेरणा जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोराचा सुरक्षित बचाव केला. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विजय मोहनराव दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली मोराला छत्रपती संभाजीनगर येथील फाऊंडेशनच्या केंद्रात हलवण्यात आले.

तिथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित परदेशी यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. नियमित निरीक्षण, योग्य आहार आणि विश्रांतीमुळे अवघ्या तीन दिवसांत मोराच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. सखोल वैद्यकीय तपासणीत त्याची उड्डाणक्षमता आणि हालचाल समाधानकारक आढळल्याने तो आता जंगलात सोडण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

याविषयीबोलताना छत्रपती संभाजीनगरचे मानद वन्यजीव रक्षक आशिष जोशी म्हणाले, "वन्यजीवाचा जीव वाचवणे म्हणजे केवळ रेस्क्यू ऑपरेशन नव्हे, तर त्याला पूर्ण निरोगी करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात पोहोचवणे महत्त्वाचे असते. फाऊंडेशनच्या योग्य सुविधा आणि तज्ज्ञांच्या उपचारांमुळे या मोराची रिकव्हरी अतिशय जलद झाली." या यशस्वी मोहिमेमुळे वन्यजीवप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT