Sambhajinagar News : पंचनामा केलेला वाळू साठा रहस्यमयरीत्या गायब  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पंचनामा केलेला वाळू साठा रहस्यमयरीत्या गायब

ढोरेगावात ग्रामस्थांचा संताप, प्रशासनावर संगनमताचे आरोप

पुढारी वृत्तसेवा

Panchnama sand deposits mysteriously disappear

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे तलाठ्यांनी पंचनामा केलेला वाळू साठा रहस्यमयरीत्या गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या वाळूचा साठा बंद कंपनीतून भरून वाहतूक केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले जात आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, पंचनामा करूनसुद्धा वाळू गायब होणे हा गंभीर गुन्हा आहे. यामध्ये वाळूमाफिया, संबंधित अधिकारी आणि काही स्थानिकांचे संगनमत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ङ्गङ्घपंचनामा म्हणजे फक्त कागदो-पत्री औपचारिकता ठरते का? जर पंचनामा करूनही वाळू गायब होत असेल, तर प्रशासनाचे डोळे बंद आहेत की जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

मात्र, या सर्व ठिकाणांवरील वाळू हळूहळू गायब होत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पोलिस पाटील, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. परिणामी ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, ङ्गङ्खवाळूमाफियांना मोकळे रान देणारे अधिकारीही दोषी आहेत; त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, फ्फ अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पंचनाम्यातील साठ्याचा तपशील

पेंढापूर-ढोरेगाव रस्त्यावरील बंद पडलेली कंपनी : २०० ब्रास, दत्त् प्रसाद हॉटेल, ढोरेगाव : १५० ब्रास, राजपूत दवाखाना समोर १०० ब्रास, फौजी धाब्याजवळ २०० ब्रास.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT