कृष्णा दिलीप लेंभे  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Paithan Student Death| गहाळ मोबाईलच्या शोधात गेलेल्या विद्यार्थ्याने गोदावरी नदीत उडी मारून जीवन संपविले

पैठण–शेवगाव मार्गावरील पाटेगाव येथील गोदावरी नदीत घटना

पुढारी वृत्तसेवा

Godavari River Student Death

पैठण: मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो शोधून येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याने गोदावरी नदीत उडी मारून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पैठण–शेवगाव मार्गावरील पाटेगाव येथील गोदावरी नदीत ही घटना घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव कृष्णा दिलीप लेंभे (वय १७, रा. इंदिरानगर, पैठण) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी कृष्णा लेंभे हा आपल्या मित्रासोबत नाथषष्ठी यात्रेला गेला होता. यात्रा पाहून दोघे घरी परतत असताना त्याचा मोबाईल गहाळ झाला. मोबाईल शोधून येतो असे मित्राला सांगून तो तेथून निघून गेला; मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही.

कृष्णा घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. अखेर शनिवारी (दि. १४) पैठण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलीस व नातेवाईक शोध घेत असताना पैठण–शेवगाव रस्त्यावरील पाटेगाव येथील गोदावरी नदीत उडी मारून त्याने जीवन संपविल्याचे उघड झाले.

घटनेची माहिती मिळताच पैठणचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, जमादार रावसाहेब आव्हाड, कर्मचारी राजेश आटोळे व गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पैठण पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT