Paithan News | चोरट्याची कमाल जालना येथील तालुका पोलीस ठाण्याचे वाहनच चोरले : डिझेल संपल्यावर पैठणमध्ये सोडून दिले!

चोरलेले शासकीय वाहन डिझेल संपल्यामुळे पैठण तालुक्यात सापडले... आरोपीला अटक करण्यात यश
Paithan News
पोलिस ठाण्याच्या आवारातून चोरुन नेलेले पोलिसांचे वाहन
Published on
Updated on

चंद्रकांत अंबिलवादे

पैठण :- जालना जिल्ह्यातील तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी वापरत असलेली शासकीय वाहन अज्ञात चोरट्याने चोरली व वाहनांमधील डिझेल संपल्यामुळे हे वाहन पैठण येथे अडकले. हे वाहन पैठण तालुक्यातील श्रुंगारवाडी शिवारात सापडले आहे.

अधिक माहिती अशी की जालना येथील तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालण्यासाठी व शासकीय कामकाजासाठी पोलीस विभागाला वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तालुका पोलीस ठाणे जालना येथील कर्मचाऱ्यांनी रात्रीची पेट्रोलिंग करून वाहन क्रमांक MH21CA--0206 जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे पाच वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे उभे केली असता सदरील शासकीय वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली व गोपनीय पद्धतीने वाहनाचा शोध सुरू केला. दरम्यान चोरट्याने सोडलेले वाहन थेट पैठण तालुक्यातील श्रुंगारवाडी शिवारात आढळले. डिझेल संपल्यामुळे हे वाहन रस्त्यावर उभे होते. या वाहना संदर्भात या परिसरातील नागरिकाचा संशय बळावला. पालिसांच्या गाडीत कर्मचारी नाही मात्र एक अज्ञात व्यक्ती असल्यामुळे या वाहना बद्दल नागरिकात संशय आल्याने सदरील माहिती पैठण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना काही नागरिकांनी दिली.

पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे, हवालदार दांडगे, राहुल बल्लाळ यांनी सदरील श्रुंगारवाडी येथे जाऊन आरोपीसह शासकीय पोलिसांचे वाहन ताब्यात घेतले. परंतु या संदर्भात पैठण पोलीस ठाण्यात कसलीही नोंद करण्यात आली नाही असे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news