कारकीन येथे पिकांची पाहणी करताना खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल व अन्य पदाधिकारी. (छाया : दादासाहेब गलांडे)
छत्रपती संभाजीनगर

Paithan rainfall shortage : पैठण तालुक्यात खा. काळेंकडून दुष्काळाची पाहणी

शेतकऱ्यांशी संवाद; सरसकट मदत देण्याची शासनाकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने पैठण तालुक्यात खरीप पिके संकटात सापडली आहेत. कापूस, मका, तूर यांसह विविध पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कल्याण काळे यांनी शनिवारी गेवराई बार्शी व कारकीन परिसरातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पावसाच्या खंडामुळे पिकांचे झालेले नुकसान, उपलब्ध पाणीसाठे आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती त्यांनी घेतली. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून केलेला खर्चही वसूल होणार नसल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

पैठण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, कर्जवसुलीस स्थगिती द्यावी, तसेच पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी,अशी मागणी करण्यात आली. टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरू करून जायकवाडीतील पाण्याचे सिंचनासाठी नियोजन करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण डोणगावकर, सरपंच किशोर दसपुते, दिलीप भोसले, राहुल सावंत, मुसा पटेल, तालुकाध्यक्ष रमेश मुळे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रवींद्र आम्ले, संभाजी काटे, सदानंद खडसन, लतीफ सैय्यद, शेखर देशमुख, गणेश गायकवाड, हसन पठाण यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

फुलंब्री तालुक्यातही पिंकांची पाहणी

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी फुलंब्री तालुक्यातील आरडगाव (बु.) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान शासनाने जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मदत करणे करावी अशी मागणी यावेळी खा. डॉ. कल्याण काळे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT