illegal sand mining Paithan pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Paithan News: चांगतपुरी फाट्यावर वाळू तस्कराविरुद्ध पैठण पोलिसांची कारवाई, ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

गोदावरी नदीतून अवैध वाळू तस्करी करणाऱ्या एका तस्करावर पैठण पोलिसांनी कारवाई करत ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Paithan News

पैठण: गोदावरी नदीतून अवैध वाळू तस्करी करणाऱ्या एका तस्करावर पैठण पोलिसांनी कारवाई करत ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोदावरी नदीतून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी चालू असल्याची माहिती पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव गोमारे यांना मिळाली. त्यानुसार तात्काळ कारवाई करण्यासाठी त्यांनी पोहेका अनिरुद्ध पवार यांचे पथक पाठवले. या पथकाला चांगतपुरी फाट्यावर 'एम.एच. २० एफ.यु. ८४६९' या क्रमांकाचा स्वराज कंपनीचा निळा ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना आढळला. पोलीस आल्याचे पाहून ट्रॅक्टरचालकाने ट्रॉलीतील वाळू तेथेच रिकामी करून ट्रॅक्टरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात पोहेका अनिरुद्ध पवार यांच्या तक्रारीवरून सचिन बाळासाहेब सोलाट (रा. दादेगाव, ता. पैठण) याच्याविरोधात गौण खनिज कायद्यांतर्गत गुन्हा दाखलन करण्यात आला आहे. पोलिसांनी ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका लक्ष्मण पुरी करत आहेत.

 ग्रामीण पोलिसांचा अवैध धंद्यांवर 'सर्जिकल स्ट्राईक'

आगामी सण-उत्सर्वाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.२४) रात्रभर 'ऑपरेशन ऑल आऊट' अंतर्गत अवघ्या १२ तासांत तब्बल १२९ आरोपींवर कारवाई करत १०४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ७५ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उत्सव काळात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळवला जातो. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या २८ जुगार अड्यांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. यात ५२ आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT