एमआयडीसी येथील वरून ब्रेवरीज कंपनीतून स्टिंग शितपेय चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करताना सपोनि भरत मोरे सह पोलीस पथक. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : पेप्सी कंपनीतील स्टिंगवर डल्ला; सुरक्षारक्षकासह चौघे जेरबंद

एमआयडीसी पोलिसांची २४ तासांत कारवाई; ट्रकसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पैठण एमआयडीसी परिसरातील वरुण बेव्-हरेजेस (पेप्सी) कंपनीतून मस्टिंगफ शीतपेयाच्या बॉक्सची चोरी करणाऱ्या सुरक्षारक्षकासह चार आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसीतील वरुण बेव्हरेजेस (पेप्सी) कंपनीतून मस्टिंगफ शीतपेयाच्या बाटल्यांचे सुमारे १ लाख ५१ हजार २०० रुपयांचे बॉक्स चोरीस गेल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

या तक्रारीनंतर ग्रामीण पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी विशेष पथकाची स्थापना केली. पोलिस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, जमादार अंकुश रहाटवाड, करतारसिंग सिंगल, राहुल महोतमल, मिलिंद घाटेश्वर, अमित घोडके आणि कृष्णा उगले यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली.

तपासादरम्यान सुरक्षारक्षक रघुनाथ हरिभाऊ मतकर (रा. शहापूर मानेगाव, ता. पैठण), ट्रक चालक उमेर मुसा शेख आणि कंपनीतील कामगार किरण लहू शेळके (दोघे रा. वाहेगाव, ता. पैठण) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडे चौकशी केली असता चोरीचा माल विक्रीसाठ दिल्याची माहिती समोर आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असत न्यायालयाने त्यांना तीन दिवसांच पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल करीत आहेत.

१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी लोहगाव (ता. पैठण) येथील मिठाई व्यावसायिक चैनसिंग ठाकूर यालाही काही तासांत ताब्यात घेतले. आरोपींकडून १ लाख १ हजार २०० रुपये रोख, स्टिंग शीतपेयाचे १० बॉक्स आणि गुन्ह्यात वापर-लेला सुमारे १५ लाख रुपयांचा ट्रक असा १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT