ST Reservation : एसटी आरक्षणात इतर जातींचा समावेश नको, सकल आदिवासी समाजाचे क्रांती चौकात धरणे  File Photo
छत्रपती संभाजीनगर

ST Reservation : एसटी आरक्षणात इतर जातींचा समावेश नको, सकल आदिवासी समाजाचे क्रांती चौकात धरणे

राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या जीआरनुसार विविध जातीसमूहांकडून एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Other castes should not be included in ST reservation, entire tribal community to hold protest Kranti Chowk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: बंजारा, वंजारी, गोपाळ, धनगर आदी विविध जातीसमूहाकडून त्यांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी होत असून, अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीला समाविष्ट करू नये, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.८) सकल आदिवासी समाजाच्या वतीने क्रांती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या जीआरनुसार विविध जातीसमूहांकडून एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी होत आहे. त्यास आदिवासी समाजाने विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोकरीत अधिसंख्या करण्यात आलेल्या १२,५०० पदांची विशेष भरती तात्काळ सुरू करावी. एससी, एसटी प्रवर्गामध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये. पेसा भरती प्रक्रिया सुरू करावी.

छोटा संवर्ग बिंदू नामावली शासन निर्णय २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये आदिवासी बिंदू ८ नंबरवर फेकला गेला आहे, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. २७ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करून आदिवासी बिंदू क्र. २ वर आणावा. जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेली सर्व सशर्त (कंडिशनल व्हॅलिडीटी) प्रकरणे आणि नियमित प्रलंबित प्रकरणे विशेष मोहिमेद्वारे तात्काळ निकाली काढण्यात यावी, यासह मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT