Lasur Station : दुचाकींची समोरा समोर धडक एक ठार, एक गंभीर File Photo
छत्रपती संभाजीनगर

Lasur Station Accident : दुचाकींची समोरा समोर धडक एक ठार, एक गंभीर

ही घटना शनिवारी सावंगी चौकात घडली.

पुढारी वृत्तसेवा

One dead, one seriously injured in head-on collision between two bikes

लासूर स्टेशनः दोन दुचाकींची समोर समोर धडक झाली. त्यात एक दुचाकीस्वार रस्त्यावर पडून पाठीमागून आलेल्या ट्रकखाली चिरडल्या गेल्याने एका चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाला. ही घटना शनिवारी सावंगी चौकात घडली. नानासाहेब पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजेश देशमुख हा गंभीर जखमी झाला आहे.

(एम एच २० जी एस ५७३८). आणि (एम एच २० बि डी ६२७६) या दोन मोटार सायकलची समोर समोर धडक झाली. यात मोटार सायकल योगेश पवार हे खाली पडले.

या सुमारास लासूर स्टेशन येथुन संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका ट्रक खाली येऊन पवार हे जागीच ठार झाले. तर राजेश देशमुख राहणार सांवगी हा गंभीर जखमी झाला. आहे या घटनेचा अधिक तपास बिट जमादार तात्यासाहेब बेंद्रे हे करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT