Ganja Seized : नारेगावच्या बलूच गल्लीतून पुन्हा दीड किलो गांजा जप्त file photo
छत्रपती संभाजीनगर

Ganja Seized : नारेगावच्या बलूच गल्लीतून पुन्हा दीड किलो गांजा जप्त

काही दिवसांपूर्वीच गांजा विक्री करणाऱ्या महिलेला पकडल्यानंतर पुन्हा एनडीपीएसच्या पथकाने नारेगावच्या बलुच गल्लीत मंगळवारी (दि. ११) छापा मारला.

पुढारी वृत्तसेवा

One and a half kg of ganja seized again from Baloch Gali of Naregaon

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वीच गांजा विक्री करणाऱ्या महिलेला पकडल्यानंतर पुन्हा एनडीपीएसच्या पथकाने नारेगावच्या बलुच गल्लीत मंगळवारी (दि. ११) छापा मारला. या कारवाई प्लंबरला १ किलो ५६ ग्रॅम गांजासह गजाआड केले. चरणसिंग मदनसिंग मलके (५०, रा. महादेव मंदिराच्या पाठीमागे, बलुच गल्ली नं. ९, भाटनगर, नारेगाव) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांनी दिली.

शहर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने एमआयडीसी सिडको हद्दीतील भाटनगर, नारेगाव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी चरणसिंग मलके हा गांजा विक्री करताना रंगेहाथ मिळून आला. त्याच्याकडून १ किलो ५६ ग्रॅम गांजा, मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा, रोख रक्कम असा ६७ हजार २२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उद्देश्वर मुंडे, हवालदार भाऊसिंग चव्हाण, नारायण पायघन, सतीश जाधव, छाया लांडगे, देशराज मोरे, विशाल मेटे, सरताज पठाण, विठ्ठल पवार यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT