Gudi Padwa : बाजारपेठेला सातशे कोटींची सुवर्णगुढी file photo
छत्रपती संभाजीनगर

Gudi Padwa : बाजारपेठेला सातशे कोटींची सुवर्णगुढी

शुभमुहूर्तावर तीनशे गृहप्रवेश, साडेतीनशे बुकिंग : ४ हजार दुचाकी, ७५० कारची विक्री

पुढारी वृत्तसेवा

On the Auspicious Occasion of Gudi Padwa: 300 Home Entry Ceremonies, 350 Bookings; Sales of 4,000 Two-Wheelers and 750 Cars

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा: हिंदू नववर्ष अर्थातच गुढीपाडव्याचा सण शहरात गुरुवारी (दि.१९) अपूर्व उत्साह आणि आनंदात साजरा झाला. या शुभदिनी बाजारपेठांमध्ये खरेदीला मोठे उधाण आले. उलाढालीला ईदची ही जोड मिळाली. पूर्ण मुहूर्ताचा योग साधत तीनशे गृहप्रवेश आणि साडेतीनशे सदनिकांची बुकिंग झाली.

इलेक्ट्रॉनिक्स गृहउपयोगी वस्तू खरेदीला गर्दी झाली. वाहन बाज-ारानेही सुसाट वेग धरला, तर सोने विक्रमी उच्चांकावर असतानाही सराफा बाजाराला नवी झळाळी आल्याने शहरातील बाजारपेठेत दिवसभरात तब्बल ७०० कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचे व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी यांनी सांगितले. दरम्यान, गॅस टंचाई आणि मध्यपूर्व देशातील युद्धाचा स्थानिक बाजारपेठेवर फारसा परिणाम जाणवला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

साडेतीन मुहूर्तातून पहिला पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी शुभ मानले जाते. या शुभदिनी गृहप्रवेश, सोने चांदीसह नवीन वस्तू खरेदीला विशेष महत्त्व असते. या शुभमुहूर्तावर विविध वस्तू खरेदीला मोठी पसंती दिली जाते. अनेक वर्षांपासून ही परंपराच बनल्याने गुरुवारी गुडीपाडव्यानिमित्त उत्साहाच्या वातावरणात खरेदीला नवे उधाण आले.

सकाळपासूच बाजारात ग्राहकांची लगबग सुरू झाली. या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असल्याने सराफा बाजारात झुंबड उडाली. सोन्या-चांदीचे, हिऱ्यांचे दागिने खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळाला. सोन्याचे विडा, नाणींस सोन्याचे कमी वजनाचे दागिने, पेंडंट मंगळसूत्र कर्णफुले, कॉइन्स अंगठ्या यांची मोठी विक्री झाली गृहउपयोगी वस्तू खरेदीसाठ इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल बाजारात ग्राहकांची गर्दी झाली. तर नवीन कपडे खरेदीसाठी कापड दुकानांमध्ये ग्राहकांची लगबग दिसून आली मुख्य बाजारपेठात रात्री उशिरापर्यंत रेलचेल सुरू होती.

तीन हजार दुचाकी, तर ७५० नवीन कार रस्त्यावर पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीला विशेष पसंती दिली. त्यामुळे वाहन बाजाराने सुसाट वेग घेतला. दिवसभरात मोपेड, दुचाकी मिळून सुमारे ३००० दुचाकींची आणि ७५० चारचाकींची विक्री झाली. यामध्ये ३५० ई-बाईक, तर १०० ई-कारही रस्त्यावर उतरल्याने सुमारे ९० कोटींहून अधिक उलाढाल झाली.
-विकास वाळवेकर, ऑटोमोबाईल असोशिएशन
तीनशे गृहप्रवेश, साडेतीनशे बुकिंग यंदा गुढीपाडवा आणि नववर्षाचा मुहूर्त साधत शहरातील सर्वच बांधकाम व्यावसायिकांकडे मिळून तीनशे नवीन गृहप्रवेश झाले. तर भविष्याच्या दृष्टीने या शुभ मुहूर्तावर साडेतीनशे नवीन सदनिका बुकिंग झाली. दुकाने, प्लॉटची मोठी बुकिंग झाली. रो हाऊसला तसेच ५० ते ६० लाखांच्या सदनिकांना विशेष पसंती मिळाली.
--संग्राम पटारे, अध्यक्ष, क्रेडाई संघटना.
सराफा बाजाराला १२ कोटींची गुढी मागील काही दिवसांपासून सोने-चांदी दरात सातत्याने वाढ सुरू आहे. मात्र ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी सोने आठ हजार, तर चांदी तब्बल २५ हजारांनी कमी झाली. पिवर सोने तोळा १ लाख ५१ हजार, तर एक किलो चांदी २ लाख ३० हजारांपर्यंत घसरली. तरी शुभमुहूर्ताचा योग साधत ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने सराफा बाजारात सुमारे १२ कोटींहून अधिकची उलाढाल झाली.
राजेंद्र मंडलिक, जिल्हाध्यक्ष सराफ असोसिएशन
इलेक्ट्रॉनिक बाजारात ५ कोटींची उलाढाल उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंडावा देणाऱ्या उपकरणांना विशेष मागणी दिसून आली. यात एसी, कूलर आणि फ्रीजच्या विक्रीत सुमारे ३.५ कोटी, तर टीव्ही विक्रीत जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली. एकूण गुढीपाडव्याच्या दिवशी शहरात सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली.
-संजय संघवी, माजी अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक डिलर्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT