Black Magic Case : साताऱ्यातील पटेल बंधूंचा काटा काढण्यासाठी अघोरी जादूटोणा file photo
छत्रपती संभाजीनगर

Black Magic Case : साताऱ्यातील पटेल बंधूंचा काटा काढण्यासाठी अघोरी जादूटोणा

भाऊ आयुब खान अटकेत; झाडाला फोटो लावून मांत्रिकामार्फत मंत्रोच्चार

पुढारी वृत्तसेवा

Oghori black magic used to eliminate the Patel brothers of Satara

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: भावानेच माजी सरपंच आणि बांधकाम व्यावसायिक असलेल्या आपल्या भावांना संपवण्यासाठी एका मांत्रिकाच्या मदतीने अघोरी जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर एका अज्ञात महिलेचा खून करून त्या गुन्ह्यात या चारही जणांना अडकवण्याचा कट रचण्यात आला होता. सातारा ठाण्यात आरोपी आयुब खान जब्बार खान पठाण आणि एका अज्ञात मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयुब खानला अटक केली असून न्यायालयाने त्याला २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांनी गुरुवारी दिली.

फिर्यादी मोहम्मद ईरशाद मोहम्मद उमर शेख (४९, रा. सादात नगर, गल्ली नं. ६) यांच्या तक्रारीनुसार, ते व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. जानेवारी २०२६ मध्ये सिल्क मिल कॉलनी येथे राहणाऱ्या आयुब खान याने ईरशाद यांना आपल्याला मोठे काम करायचे आहे, असे म्हणत दिवसाला दोन हजार रुपये पगाराचे आमिष दाखवून स्वतःचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवले होते.

आयुब खान याचे फेरोज पटेल, अशपाक पटेल, अमजद पटेल आणि खालेद पटेल यांच्याशी वैर होते. सुरुवातीला आयुब खान याने अशपाक पटेल यांच्या 'ज्योती बिल्डर्स'च्या ऑफिसमध्ये गांजा ठेवून त्यांना अडकवण्यास ईरशाद यांना सांगितले होते, मात्र त्यांनी यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर या चौघांना संपवण्यासाठी आयुब खान याने एका मांत्रिकाला गाठले. वाळूज भागात तील एका सामसूम ठिकाणी या मांत्रिकाने आणि आयुब खानने जादूटोणा केला. मंत्रोच्चार करत काही वस्तू जाळून या चारही शत्रूचे पासपोर्ट साईज फोटो झाडाच्या बुंध्याला खिळ्यांनी ठोकण्यात आले.

खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याचा होता डाव

दोन महिन्यांपूर्वी आयुब खान लासूर येथे जमीन घ्यायची असे सांगून ईरशादला सोबत घेऊन गेला. तिथे त्याने आणखी एक भयानक कट सांगितला. तो एका अज्ञात महिलेचा खून करणार असून, त्या खुनाचा आरोप अशपाक, फेरोज, अमजद आणि खालेद यांच्यावर टाकून त्यांना अडकवणार असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी महिलाही शोधल्याचे सांगितले. हा प्रकार ऐकून घाबरलेल्या ईरशादने त्याचे काम सोडले. त्यानंतर आयुबखानने त्याला जीवे मारण्याची, खोटी तक्रार देण्याची आणि त्याच्यावरही जादूटोणा करून संपवण्याची धमकी दिली. अखेर ईरशाद यांनी पोलिसांत धाव घेत सर्व प्रकार आणि व्हिडिओ पुरावे पोलिसांसमोर मांडले. अधिक तपास पोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे करत आहेत.

राजकीय, व्यावसायिक वर्चस्वातून प्रकार

फेरोज पटेल हे सातारा गावचे माजी सरपंच असून त्यांच्या पत्नी जि.प. अध्यक्षा राहिलेल्या आहेत. फेरोज यांनी मनपा निवडणूक लढवली होती. तर अश्फाक पटेल हे ज्योती बिल्डर्स नावाने व्यवसाय सांभाळतात. अमजद आणि खालेद पटेल हेही त्यांच्याच कुटुंबातीलच आहेत. राजकीय व व्यावसायिक वर्चस्व वादातून हा संपूर्ण घडला असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT