Now 18 water bodies are operational for the city every three to four days: CIDCO-Hadkot speed up distribution
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सहा दिवसांआड पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करणाऱ्या शहरातील अनेक भागांना आता दिलासा मिळत आहे. अमृत-२ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील १८ जलकुंभ कार्यान्वित झाल्याने वितरण व्यवस्थेला वेग आला आहे. सिडको-हडको परिसरात तीन दिवसांआड, तर काही भागांत चार दिवसांआड पाणी मिळत असून नवीन जलवाहिन्यांमुळे पाण्याचा दाबही वाढला आहे. त्यामुळे वितरणाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास मदत होत आहे.
शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जीव्हीपीआर कंपनीकडून राबविण्यात येत आहे. जायकवाडीहून दोन पंपांच्या माध्यमातून सध्या १०० एमएलडी पाणी उपसले जात आहे. नक्षत्रवाडी एमबीआरमधून १५००, २००० आणि १११८ मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे शहरातील विविध जलकुंभांमध्ये पाणी पोहोचविले जात आहे.
तसेच जुलैपासून १५०० मिमी जलवाहिनीच्या माध्यमातून सिडको एन-५, एन-७, हरसिद्धीमाता, मिसारवाडी, टीव्ही सेंटर-३ आणि हिमायतबाग जलकुंभांना पाणी देण्यात येत आहे. २००० मिमी जलवाहिनीवरून म्हाडा कॉलनी, हरिओमनगर, शिवाजीनगर, पुंडलिकनगर, पारिजातनगर आणि केटली गार्डनला, ११०० मिमी जलवाहिनीवरून नक्षत्रवाडी व हिंदुस्तान आवासला, तर १४०० मिमी जलवाहिनीवरून प्रतापनगरला पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
हर्मूल जेल आणि हर्सल जलशुद्धीकरण केंद्रातील जलकुंभांमध्येही पाणी घेण्यास सुरुवात झाली आहे. शहरात एकूण १९०० किमी पाइपलाइन टाकण्याचे नियोजन आहे. त्यापैकी १२०० किमीचे काम पूर्ण झाले आहे. जीव्हीपीआरकडून २० हजार नळकनेक्शन देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ४५ हजार जोडण्या देण्यात आल्या आहेत.
नेटवर्क नसलेल्या भागांत महापालिकेमार्फत नळजोडणी करण्यात येणार आहे. दरम्यान, सातारा-देवळाई परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांमधील गॅप भरून काढण्याचे काम सुरू आहे. सुधाकरनगर, अमेरनगर, एजीपी पब्लिक स्कूल, हरिओमनगर आणि म्हाडा कॉलनी जलकुंभांतून या भागाला पाणी देण्यात येणार आहे. जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर झाल्यानंतर ऑक्टोबर ऑक्टोबर ते ते नोव्हेंबरअखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याचे