Crime News : कुख्यात तेज्याने 'हर्सूल'मध्ये आणले ड्रग्ज file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : कुख्यात तेज्याने 'हर्सूल'मध्ये आणले ड्रग्ज

१५ ग्रॅमची चरसची गोळी जप्त; जेलच्या झडतीत प्रकार उघड

पुढारी वृत्तसेवा

Notorious Teja brings drugs into Harsul.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुन्हेगार आणि ड्रग्ज तस्कर सय्यद फैजल ऊर्फ तेज्या याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेट हर्मूल मध्यवर्ती कारागृहात चरस नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयातील सुनावणी संपवून परतल्यानंतर, जेलच्या झडती कक्षात त्याच्याकडे १५.३६० ग्रॅमची चरसची गोळी सापडली. हा प्रकार मंगळवारी (दि. १९) दुपारी घडला असून, हसूल पोलिसांनी तेज्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकारामुळे कैद्यांची कोर्टात ने-आण करणाऱ्या आरोपी पार्टी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हर्मूल कारागृहातील बंदी तेज्या कोर्टातून परतल्यावर कारागृह हवालदार सुरेश हे निवारे नेहमीप्रमाणे त्याची अंगझडती घेत होते.

यावेळी तेज्याने पोलिसांची नजर आणलेली गोळी लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र झडतीत ती पकडली गेली. याप्रकरणी हवालदार निवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक गणेश केदार पुढील तपास करत आहेत.

चुकवून सराईत गुन्हेगार तेज्यावर १७पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असून मैत्रिणीवर गोळीबार केल्याप्रकरणी त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. कोर्टातून बाहेर आल्यावर गुन्हेगारांचे समर्थक पोलिसांच्या उपस्थितीत रिल्स बनवतात व कैदी हातकडी असतानाही सिगारेट ओढतात, अशा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढल्याचे चित्र असून संबंधित पोलिसांवर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT