Notices issued to 50 shopkeepers, action taken against dangerous and unauthorized buildings at Mondha
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या विकास आराखड्यातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासह सर्व्हिस रोडसाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात मोहिमेअंतर्गत जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांना महापालिकेने दुकाने व इमारती पाडापाडीच्या नोटीस बजावल्या आहेत. यात काहींना धोकादायक म्हणून तर काहींना अनधिकृत वाढीव बांधकाम असल्याने कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ५० हून अधिक धास्तावलेले व्यापारी न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.
महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत बीड बायपास रस्ता, रंगारगल्ली ते सिटी चौक आणि मुकुंदवाडी ते संजयनगर रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सर्व्हिस रोडची जागा मोकळी केली आहे. लवकरच पडेगाव आणि पैठण रस्त्यावरही मोहीम राबविली जाणार आहे.
प्रमुख रस्त्यांसोबतच महापालिकेने आता विकास आर-ाखड्यातील अंतर्गत रस्तेही मोकळे करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शहराच्या मुख्य बाजारपेठेतील काही पीआरकार्ड एक मालमत्ताधारक दोन जुना मोंढा भागात अनेक व्यापाऱ्यांच्या पीआर कार्डचा वाद आहे. यात दोन मालमत्ताधारकांचा एकाच पीआर कार्डावर उल्लेख आहे. हा प्रकार बहुतांश मालमत्तांबाबत आहे. त्यामुळे मोबदल्यावेळी अनेकांच्या अडचणी होणार असल्याचीही चर्चा आहे.
मुख्य बाजारपेठेतील रंगारगल्ली, सराफाबाजार, गुलमंडी (बाराभाई ताजीया) ते अंगुरीबाग पुढे नवाबपुरा ते राजाबाजार येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने रुंदीकरणावर भर दिला आहे. यात गुलमंडी ते नवाबपुरा या १५ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाची कारवाई हळूहळू सुरू झाली असून, येथील बाधित ६० मालमत्ताधारकांना प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत.