Sambhajinagar Political : घुसखोरी नव्हे, मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीत : जरांगे यांचे भुजबळांच्या टीकेला उत्तर  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Political : घुसखोरी नव्हे, मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीत : जरांगे यांचे भुजबळांच्या टीकेला उत्तर

मनोज जरांगे यांनी शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधला.

पुढारी वृत्तसेवा

Not infiltration, Maratha community has been OBC since long: Jarange's response to Bhujbal's criticism

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा समाज १८८१ पासून ओबीसी आर-क्षणात आहे. मंत्री छगन भुजबळ १९९४ मध्ये आले आहेत. त्यामुळे आम्ही घुसखोरी केलेली नाही, तर हा आमचा ओबीसीत अधिकृत प्रवेश आहे, असे स्पष्ट शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या 'मराठ्यांनी ओबीसीत घुसखोरी केली', या टीकेला सडेतोड उत्तर दिले. शुक्रवारी (दि.५) सकाळी शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसकट मराठा आरक्षणात जाणार नाही, असे बोलत असले तरी मराठवाड्यातील मराठे आरक्षणात जाणार आहेत, यात कोणताही संभ्रम नाही. आम्ही जीआर दुरुस्त करून सुधारित जीआर काढण्याची मागणी केली आहे. तसेच आरक्षणाची प्रक्रिया कशी असेल, प्रमाणपत्रे कधीपासून मिळणार, याबाबत सरकारसोबत चर्चा झाली आहे.

भुजबळ यांना जीआर चांगला समजतो, कारण त्यांनी सत्ता व मंत्रिपद भोगले आहे. मात्र आता जीआर निघालाच असून, त्याची अंमलबजावणी होणार हे निश्चित आहे. ते पुढे म्हणाले, मराठा समाज एकजुटीने, शांततेच्या मागनि मुंबईला गेला आणि विजय घेऊन परतलाच. मराठा नेते माझ्या विरोधात का जातात हे मला ठाऊक नाही, पण आमचा हक्क आम्ही मिळवला आहे, असा ठाम दावा त्यांनी केला.

अन्यथा मंडल आयोगालाच आव्हान

मंत्री छगन भुजबळ हैद्राबाद गॅझेटवरील जीआर विरोधात कोर्टात गेले तरी काही होणार नाही. कारण हैद्राबाद गॅझेट हा सरकारी दस्तऐवज आहे. कोर्टाने काही निर्णय दिला तरी आम्ही मंडल आयोगालाच आव्हान देऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT