Newly elected corporators at risk of disqualification
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अनधिकृत बांधकाम, तीन अपत्ये आणि अतिक्रमणासह विविध कारणांवरून दाखल झालेल्या तक्रारारींवरून २७ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रकरणांनी आता सुनावणीचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम १० (१) (ड) अन्वये संबंधित नगरसेवकांना एकूण ३७ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी आठ नोटिसांवर आज सोमवारी दुपारी ३ वाजता महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी नवनि-र्वाचित नगरसेवकांविरोधात विविध तक्रारी दाखल केल्या. तीन अपत्ये असणे, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम करणे, महापालिका प्रशासनाच्या कारवाईला विरोध करणे यासह सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आले आहेत.
यात संबंधित नगरसेवकांवर कलम १० (ड) (१ अन्वये अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने जन्म-मृत्यू, नगर-रचना आणि अतिक्रमण विभागाकडून संबंधित प्रकरणांचे अहवाल मागविले. त्यानंतर जुलै महिन्यात २५ नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या.
काही नगरसे- वकांविरोधात एकापेक्षा अधिक कारणां-वरून तक्रारी असल्याने त्यांना स्वतंत्र नोटिसा देण्यात आल्या. त्यामुळे २७ नगर-सेवकांविरोधातील नोटिसांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. त्यानंतर महापालिका निवडणूक विभागाने सुनावणीसाठी १७ व २४ ऑगस्ट तसेच ७ आणि १५ सप्टेंबर या तारखा निश्चित केल्या आहेत. संबंधित नगरसेवक आणि तक्रारदारांना सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नोटिसा बजावण्यात आलेल्यांमध्ये एमआयएमचे १८, भाजपचे सहा आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे-
निकाल वेळेत जाहीर होण्याची अपेक्षा
तक्रारी दाखल झाल्यानंतर चौकशी करून नोटिसा बजावण्याच्या प्रक्रियेला प्रशासनाने बराच कालावधी घेतल्याबद्दल तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यासही विलंब होऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. आयुक्तांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रकरणांचा वेळेत निपटारा करून निकाल जाहीर करावा, अशी अपेक्षा तक्रारदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या नगरसेवकांना नोटीसा
विविध प्रकरणांवरून तक्रार दाखल करण्यात आलेल्या यादीत सर्वाधिक १८ एमआयएम नगरसेवकांचा समावेश आहे. यात अब्दुल समीर साजिद (विरोधी पक्षनेता), सय्यद ओसामा अब्दुल कदीर, नूर जहान इकबाल, फेरोज खान मोईनुद्दीन खान, खान अब्दुल मतीन, मोहम्मद वसीम अलीम अहेमद, सय्यद सोहेल सय्यद महेमूद, मेराज खान जलील खान, मुन्शी भिकन शेख, शेख नर्गीस सलीम, मो. वाजेद मो. अय्युब, फरजाना शेख गुलाम रसूल, पठाण मजहर पठाण अय्युब, अली मीर वाजीद, अशोक रंगनाथ हिवराळे, काकासाहेब काकडे, तरन्नुम अकील अहेमद, शाहीन रहीम पटेल यांचा समावेश आहे. तर भाजपच्या मयूर वंजारी, संगीता सांगळे, भारती सोनवणे, जीवाकपाल हिवराळे, गणेश नावंदर, विश्वनाथ स्वामी. आणि शिवसेनेचे अभिजित जिवनवाल या नगरसेवकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.