Chhatrapati Sambhajinagar : ऑरिकमध्ये आयटी हबचे नवे पर्व, दोन अमेरिकन कंपन्यांना १२ एकर जागा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : ऑरिकमध्ये आयटी हबचे नवे पर्व, दोन अमेरिकन कंपन्यांना १२ एकर जागा

दीड वर्षात उभी राहणार इमारत, सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी

पुढारी वृत्तसेवा

New phase for the IT hub at AURIC; 12 acres of land allotted to two American companies

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऑटो-ईव्ही हबनंतर आता छत्रपती संभाजीनगराची 'आयटी हब'च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. येथील आरिकमध्ये दोन अमेरिकन कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली असून, यात एका कंपनीला आयटी प्रकल्पासाठी आठ एकर जागा देण्यात आली आहे.

या कंपनीने काम सुरू केले आहे. दीड वर्षात कंपनीची इमारत उभारण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या एका अमेरिकन कंपनीलाही चार एकर जागा देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. टोयोटा किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या काम प्रगतिपथावर एथर, गुंतवणुकीनंतर त्यांच्या प्रकल्पाचे आहे.

यासोबतच ऑरिकच्या शेंद्रा भागात अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक संस्था अल्ड्रिच कॅपिटल पार्टनर्सला आयटी प्रकल्पासाठी आठ एकर जागेत आपल्या गुंतवणूकदार कंपन्यांच्या माध्यमातून कामकाज सुरू केले आहे. कंपनीने ऑरिकमध्ये खासगी आयटी पार्क उभारण्याची योजना यापूर्वी जाहीर केली होती-

या प्रकल्पातून सुमारे दोन हजार आयटी व्यावसायिकांना रोजगार देण्याचे City उद्दिष्ट व्यक्त ऑरिकमध्ये वाहन, अभियांत्रिकी, a DMIC node करण्यात आले होते. इलेक्ट्रिक वाहन, औषधनिर्मिती आणि अन्य उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांची गुंतवणूक वाढत असतानाच आता आयटी क्षेत्रातील कंपन्यांनाही जागा मिळत आहे. त्यामुळे उत्पादन उद्योगासोबत सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे नवे केंद्र विकसित होण्याच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली आहे.

या सुविधांमुळे ऑरिकला प्राधान्य

ऑरिकमध्ये आयटी कंपन्यांसाठी आवश्यक असलेली विनाखंड इंटरनेट, वीज पुरवठा उपलब्ध आहे. सहा १ हायस्पीड ऑप्टिक फायबरच्या विविध कंपनीच्या माध्यमातून वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तसेच अखंड वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांना कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची चिंता राहणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या सुविधांसह रेडी इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा...

आयटी कंपन्यांसाठी कार्यालयीन जागेसोबत वेगवान इंटरनेट, अखंड वीज, पाणी, रस्ते आणि अन्य सुविधा महत्त्वाच्या असतात. ऑरिकमध्ये या सुविधा उपलब्ध असल्याने कंपन्यांना स्वतंत्रपणे मोठी पायाभूत सुविधा उभारण्याची गरज कमी होणार आहे. यामुळे नवीन कंपन्यांना कामकाज सुरू करणे तुलनेने सुलभ होणार आहे. अल्ड्रिचच्या सुरुवातीच्या कामकाजातून स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यास सुरुवात झाली. सध्या १०० विद्यार्थी व कर्मचारी, अधिकारी येथे असल्याचे कळले. आगामी प्रकल्पामुळे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

आयटी कंपन्यांचा मार्ग मोकळा

ऑरिकमध्ये दोन अमेरिकी कंपन्यांना जागा मिळणे ही त्याची सुरुवात असून, भविष्यात ऑरिकमध्ये आणखी 3 आयटी कंपन्या येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. तसेच स्थानिकांनी ही यासाठी जागेची मागणी केली आहे. त्याचबरोबर मागील अनेक दिवसांपासून सीएमआयएने आयटी पार्कसाठी आणखी १० एकर जागेची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT