अपघातात ट्रकखाली चिरडलेली मोटारसायकल Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Accident | नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रक - दुचाकीची धडक; केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानासह तरूण जागीच ठार

नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा सापळा ठरलेल्या नांदगाव शिवारातील धोकादायक वळणावर भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Nashik Chhatrapati Sambhajinagar Highway Truck Bike Collision

वैजापूर : नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा सापळा ठरलेल्या नांदगाव शिवारातील धोकादायक वळणावर सोमवारी (दि.१२) सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन केंद्रीय सशस्त्र सीमा दलातील जवानासह त्याच्या मामे भाऊ जागीच मृत्यू झाला.सोमनाथ गोरखनाथ जाधव (वय ३४, रा. अमळनेर-कायगाव,ता.गंगापूर) आणि हिरामण माळी (वय अंदाजे ४५, रा. वडगाव-अंबेलोड, ता. सिल्लोड) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात मोटारसायकल आणि मोबाइलचा अक्षरशः चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वैजापूरहून येवल्याच्या दिशेने एक भरधाव ट्रक जात होता. नांदगाव शिवारातील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या मोटारसायकलला ट्रकची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, मोटारसायकल थेट ट्रकच्या खाली गेली. या दुर्घटनेत सोमनाथ जाधव आणि हिरामण माळी यांना गंभीर दुखापत होऊन दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच वाहेद पठाण यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत दोघांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर मृतांची ओळख पटवताना सोमनाथ जाधव यांच्या खिशात ओळखपत्र आढळले. त्यावरून ते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील सशस्त्र सीमा दलात बिहार येथे कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने बिहारमधील युनिटशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.जाधव हे दलाचे कर्मचारी असून १३ ऑक्टोबरपर्यंत रजेवर असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.कदाचीत हिरामण भावाला मनमाड येथील जंक्शन रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT