Special Train file photo
छत्रपती संभाजीनगर

Festive season train booking : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांना दिलासा

विशेष गाड्यांत ५ हजारांहून अधिक सीट रिक्त; प्रवाशांची गैरसोय दूर होणार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात आसने आणि बर्थ उपलब्ध आहेत. नांदेड आणि जालना येथून सुटणाऱ्या सहा विशेष रेल्वेगाड्यांमध्ये हजारो जागा रिक्त असल्याने प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची संधी मिळणार आहे.

नांदेड-हजरत निजामुद्दीन विशेष गाडीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील विविध तारखांना ४१० ते ५०३ जागा उपलब्ध आहेत. नांदेड-उधना गाडीत ६५० हून अधिक तर जालना-छपरा गाडीत ६२३ ते ७७६, तर जालना-यलहंका गाडीत ६७९ ते ७९६ जागा उपलब्ध आहेत. जालना-तिरुपती गाडीत २४२ ते ७३७, तसेच नांदेड-तिरुचानूरमध्ये ५९२ ते ९८७जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून आगाऊ आरक्षणाचा लाभघेण्याचे आवाहन केले आहे.

दिवाळी आणि अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर नियमित

रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल होत असताना विशेष गाड्यांमधील उपलब्ध जागा प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंतच्या आरक्षण स्थितीनुसार उपलब्ध बर्थची माहिती जाहीर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT