Municipal Schools : मनपा शाळांचा स्मार्ट प्रवास वेगात; गुणवत्तेवर भर file photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal Schools : मनपा शाळांचा स्मार्ट प्रवास वेगात; गुणवत्तेवर भर

मनपाच्या शाळांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ; सभापती अनिल मकरियेंचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

Municipal Schools' 'Smart' Transformation Accelerates; Emphasis on Quality

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, मात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी मनपा शिक्षण विभागाच्या आढवा बैठकीत दिले.

मनपा स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी सादरीकरण केले. या उपक्रमामुळे मनपाच्या शाळांमधील पटसंख्या आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढल्याचे निदर्शनास आले.

बहुतांश शाळा स्मार्ट स्वरूपात विकसित झाल्याचे पाहून सभापती मकरिये यांनी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. तसेच, ज्या शाळांमध्ये अजून काही सोयीसुविधांची गरज आहे, त्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या बैठकीला उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, अधीक्षक गोविंद बाराबोटे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांच्यासह सर्व केंद्रीय मुख्याध्यापक, अंतर्गत शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानदेव सांगळे यांनी केले. यावेळी शहरातील महानगर पोलिकेच्या सर्व शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.

मुख्याध्यापकांनी जबाबदारीने कामे करावीत

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. किराडपुरा क्रमांक १ तसेच नारेगाव येथील मराठी व उर्दू शाळा (सिल्क मिल कॉलनी) येथे वाढलेली पटसंख्या विशेष उल्लेखनीय असल्याचे सांगत या शाळांचे अभिनंदनही करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT