Municipal Elections : प्रत्येक मतदाराला चार मतदान करावेच लागणार pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal Elections : प्रत्येक मतदाराला चार मतदान करावेच लागणार

मग उमेदवारांना मत द्या की, नोटाचे बटन दाबा

पुढारी वृत्तसेवा

Municipal Elections: Every voter will have to cast four votes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या २९ प्रभागांतील ११५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी मतदान होणार आहे. यंदा पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मतदान करावेच लागणार आहेत. हे चारही मतदान बंधनकारक असून, त्यात जर एखाद्या मतदाराने केवळ एक मतदान करून उर्वरित मत देण्यास नकार दिला, तर तरतुदीनुसार एजंटच्या उपस्थितीमध्ये केंद्राध्यक्षांना नोटा बटन दाबवू प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा प्रभाग पद्धतीने निवडणुका होत आहेत. त्यामुळे मतदान कसे करावे, मतदान करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणांकडून जनजगृती करण्यावर भर देण्यात येत आहे. महापालिकेच्या या निवडणुकीसाठी लवकरच ईव्हीएम मशीन प्रशासनाला प्राप्त होणार आहे. प्रत्येक मतदाराला चार मतदान करणे बंधनकारकच आहे.

याविषयी निवडणूक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले की, मतदान यंत्रावर एक मतदान केल्यानंतर पुढील चार मतदान करणेही आवश्यक आहे. एखाद्या मतदाराने मतदान करताना एक मतदान केले आणि त्या प्रभागातील इतर तीन सदस्यांसाठी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. तर त्यास एक तर नोटा बटन दाबावे लागेल. नसता मतदान केंद्रावरील एजंटांच्या उपस्थितीत केंद्राध्यक्षाला नोटा बटन दाबावे लागेल. तेव्हाच प्रक्रिया पुढे जाईल, असेही ते म्हणाले. तसे अधिकार आयोगाने मतदान केंद्राध्यक्षाला दिले आहेत.

ईव्हीएम येताच जनजागृती

महापालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप प्रशासनाला ईव्हीएम मशीन प्राप्त झालेले नाहीत. हे मशीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासन आयोगाच्या सूचनेनुसार प्रकिया करून मतदान यंत्र वापरासाठी सज्ज करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT