Municipal Council, Nagar Panchayat elections: Picture clear after withdrawal of applications
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मराठवाड्यात होणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचे चित्र शुक्रवारी (दि.२१) स्पष्ट झाले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच ठिकाणी मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. अखेर या निवडणुकीत भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या महायुतीत फूट पडली. तर काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार गट) या महाविकास आघाडीतही विघाडी पाहायला मिळाली. मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील परळी वगळता अन्य ठिकाणी पक्ष वेगवेगळे लढत आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण निवडणुकीतून काँग्रेसची अबस्था फारच बिकट झाली. अनेक ठिकाणी काँग्रेसला उमेदवारच मिळाले नाहीत.
बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्वात आधी नगरपरिषद, नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. १७ नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. या निवडणुकासाठी महायुती व महाआघाडी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले. मात्र ते निष्फळ ठरले. त्यानंतर सर्व पक्षांनी स्वःबळाची तयारी केली.
शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या क्षणापर्यंत महायुती आणि आघाडीच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी युती आघाडीचे समीकरण जुळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र ते फोल ठरले. बीड जिल्ह्यातील केवळ परळी नगरपरिषदेतच महायुती आणि आघाडीचे समीकरण जुळले. अन्य ठिकाणी कुठे भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत युती करून निवडणुकीत लढत आहेत, तर कुठे शिंदे गटासोबत युती करून लढत आहेत. तर कुठे अजित पवार गट भाजप आणि शिंदे गटाविरोधात लढत आहे. मराठवाड्यात अनेक नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीतही फूट पडल्याचे दिसून येते.
असे आहे मराठवाड्यातील लढतीचे चित्र
परभणी जिल्हा
मानवत : राणी अंकुश लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), अंजली महेश कोक्कर (शिवसेना शिंदे गट). पाथरी : जुनेद खान दुरानी (काँग्रेस), मोईज अन्सारी (राष्ट्रवादी काँग्रेस), असेफ खान (शिवसेना शिंदे गट), जिंतूर प्रताप देशमुख (भाजप), साबिया बेगम कफील फारूकी (राष्ट्रवादी काँग्रेस), सेलू मिलिद सावंत (भाजप), आत्माराम साळवे (काँग्रेस). पूर्णा प्रेमला एकलारे (शिवसेना उबाठा), विमलबाई कदम (पूर्णा विकास आघाडी), सोनपेठ चंद्रकांत राठोड (राष्ट्रवादी काँग्रेस), परमेश्वर कदम (शहर विकास आघाडी), गंगाखेड उर्मिला ताई केंद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस), जयश्री मुंडे (भाजप). निर्मलादेवी तापडिया (शहर विकास आघाडी)
लातूर जिल्हा
औसा: ज्योती महादेव बनसोडे (भाजपा), शेख परवीन नवाबोद्दीन (अजित पवार गट), मंजूषा रुपेश माडजे (शिवसेना ठाकरे गट), लोने खाजाबी महेबुब (बसपा), अमृता अविनाश खुरपे (रासप). निलंगा संजयराज हलगरकर (भाजपा), हमीद शेख (कॉंग्रेस), लिंबन अप्पा रेश्मे (उबाठा), मुजीब सौदागर (वंचित बहुजन आघाडी). अहमदपूर अभय बळवंत मिरकले (अजित पवार गट), अॅड. स्वपनिल महारुद्र व्हत्ते (भाजपा), शेख कलीमोद्दीन अहमद हकीम (काँग्रेस)
रेणापूर : शोभा शामराव आकनगिरे (भाजप), अर्चना प्रदीप माने (काँग्रेस) ज्योती बाजीराव एकुर्के (अपक्ष), ज्योती रविकांत चव्हाण (शिवसेना शिंदे गट), बागवान मन्त्रावी निजामुद्दीन शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट), अर्चना अभयसिंह गाडे (अपक्ष)
धाराशिव जिल्हा
धाराशिव : नेहा काकडे (भाजप), संगीता गुरव (शिवसेना, उबाठा), परवीन कुरेशी
- शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, मंजुषा साखरे (अजित पवार राष्ट्रवादी) परंडा : जाकीर सौदागर (शिंदे शिवसेना), विश्वजित पाटील (भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (संयुक्त पॅनेल). भूम संयोगिता गाढवे शिंदे शिवसेना (आलमप्रभू शहर विकास आघाडी), सत्वशिला थोरात (भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (संयुक्त पॅनेल). तुळजापूर: विनोद गंगणे महायुती (भाजप, शिंदे सेना, अजित पवार राष्ट्रवादी एकत्र), अमर मगर (महाविकास आघाडी (ठाकरे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार एकत्र), महंत इच्छागिरी महाराज (अपक्ष). नळदुर्ग बसवराज धरणे (भाजप, शिंदे शिवसेना युती), अशोक जगदाळे (शिवसेना उबाठा, काँग्रेस आघाडी), संजय बताले (राष्ट्रवादी अजित पवार), शहेबाज काझी (एआयएमआयएम), कळंब सुनंदा कापसे (भाजप, शिंदे शिवसेना युती), डॉ. मीनाक्षी भवर (दोन्ही राष्ट्रवादी आघाडी), रश्मी मुंदडा (शिवसेना उबाठा, काँग्रेस आघाडी), मुरुम बापूराव पाटील (भाजप), अजित चौधरी (काँग्रेस, शिवसेना उबाठा आघाडी), चंद्रशेखर मुदकण्णा (शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी). उमरगा : हर्षवर्धन चालुक्य (भाजप, अजित पवार राष्ट्रवादी युती), किरण गायकवाड (शिंदे शिवसेना, काँग्रेस), रज्जाक अत्तार शिवसेना उबाठा, मनसे.
बीड जिल्हा
बीड : डॉ. ज्योती घुमरे (भाजपा), प्रेमलता पारवे (राष्ट्रवादी अजित पवार), स्मिता वाघमारे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), सुरेखा श्रृंगारे (एमआयएम)
गेवराई : शीतल दाभाडे (राष्ट्रवादी अजित पवार), गीता पवार (भाजपा), बागवान जबीन जान महंमद (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), संदिपा साळवे (काँग्रेस)
माजलगाव : संध्या मॅडके (भाजपा), मेहरीना बिलाल चाऊस (राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार), सोनाली पैंजणे (शिवसेना उद्धव ठाकरे), नेरोनिसा खलील पटेल (राष्ट्रवादी अजित पवार), परळी पद्मश्री धर्माधिकारी (महायुती), संध्या देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) धारुर रामचंद्र निर्मळ (भाजपा), बालासाहेब जाधव (राष्ट्रवादी अजित पवार), अर्जुन गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) सुरेश गवळी (शिवसेना उद्धव ठाकरे). अंबाजोगाई नंदकिशोर मुंदडा (भाजप पुरस्कृत आघाडी), राजकिशोर मोदी (राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडी)
हिंगोली जिल्हा
हिंगोली : रेखा बांगर (शिंद सेना), नीता बांगर (भाजप), अमिनाबी शेख (राष्ट्रवादी अजित पवार गट), अर्चना भिसे (महाविकास आघाडी)
कळमनुरी: कौसर कुरेशी (काँग्रेस), नूरूनिस्सा बेगम म. नाजीम (राष्ट्रवादी अजित पवार गट), आश्लेषा चौधरी (शिंदे सेना), सुवर्णा देशमुख (उबाठा), वैशाली कावडे (भाजप). बसमत: सीमा अब्दुल हाफिज (काँग्रेस), सुनीता बाहेती (राष्ट्रवादी अजित पवार गट), सुषमा बोड्डेवार (भाजप), प्रभावती खंदारे (वंचित आघाडी), पठाण फैजा कौसर (एमआयएम)