Encroachment : रस्त्यांवरील बांधकाम साहित्यावर मनपाची बुलडोझर कारवाई file photo
छत्रपती संभाजीनगर

Encroachment : रस्त्यांवरील बांधकाम साहित्यावर मनपाची बुलडोझर कारवाई

किराडपुरा व एन-७ सिडको परिसरात धडक मोहीम : दोन हायवा साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation's Bulldozer Action Against Construction Material on Roads

संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर रेती, खडी, विटा तसेच इतर बांधकाम साहित्य टाकून अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने गुरुवारी (दि.२१) कारवाईचा बडगा उगारला. किराडपुरा आणि एन-७सिडको परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य दोन हायवा वाहनांद्वारे गरवारे स्टेडियम येथे जमा करण्यात आले.

महापालिकेने रस्त्यांवरच ठिय्या मांडलेल्या रेती, खडी, विटा तसेच इतर बांधकाम साहित्याविरोधात गुरुव ारी कठोर कारवाई केली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार, मुख्य अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे व उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने हि कारवाई राबवली.

यातकिराडपुरा येथील राम मंदिर रोड परिसरात रस्त्याच्या दुतर्फा रेती, खडी व विटांचे ढिगारे टाकण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने मनपाने तातडीने साहित्य हटवून जप्त केले. तसेच एन-७ सिडको परिसरातील साखरे मंगल कार्यालय आणि गुलाब विश्व कार्यालय रोड भागातही रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्याविरोधात मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईत रेती, खडी, विटा, कचरा तसेच इतर साहित्य हटवून जप्त करण्यात आले. सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवणे आणि नागरिकांना वाहतुकीतून दिलासा देणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या मोहिमेत इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ तसेच नागरी मित्र पथकाने सहभाग घेतला. मनपाच्या या कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे झाल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मनपाचा इशारा

सार्वजनिक रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकून अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT