Sambhaji Nagar News : महापालिका लवकरच काढणार ई-डबलडेकर बससाठी निविदा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : महापालिका लवकरच काढणार ई-डबलडेकर बससाठी निविदा

पुढील आठवड्यात प्रात्यक्षिक; एकच कंपनी सरसावली

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation will soon issue tender for e-double-decker buses

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी महापालिका ओपन टू स्काय ई डबलडेकर बस खरेदी करणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात एका कंपनीच्या वतीने प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार असून त्यानंतर निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील पर्यटन बाढीसाठी एक खुल्या छताची डबलडेकर बस खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया देखील राबविली होती. मात्र आरटीओच्या नव्या नियमानुसार डिझेलची डबलडेकर बस खरेदी प्रक्रिया अडचणीत आली.

त्यामुळे महापालिकेने डिझेलऐवजी ई डबलडेकर बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. मात्र, ई डबलडेकर तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी केवळ एकाच कंपनीने महापालिकेशी संपर्क साधला आहे. दरम्यान, महापालिका यांत्रिक विभागाने इतरही कंपन्यांशी याबाचत संपर्क साधला आहे. परंतु, त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळा लेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे येत्या आठवड्यात ही कंपनी महापालिकेत ई डबलडेकर बसवावत प्रात्यक्षिक सादर करणार आहे. प्रशासन यावर समाधानी झाले. तर या बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविणार आहे. पर्यटकांना अकर्षित करण्यासाठी प्रशासन एक बस खरेदी करणार आहे.

तर चार महिन्यात बस येईल

महापालिकेला या कंपनीची ई डबलडेकर बस योग्य वाटली. तर बस बांधणीसाठी चार महिने लागतील, त्यानंतर ही बस महापालिकेला मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार येत्या दिवाळीपर्यंत ई डबलडेकर बस मिळेल, अशी शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT