Chatrapati Sambhajinagar : मनपाची ऑनलाईन कर भरणा यंत्रणा ठप्प File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कर थकबाकीदारांविरोधात मनपाची पुन्हा धडक मोहीम

१५ मालमत्ता सील : एका दिवसात एक कोटीहून अधिक कर वसूल, सर्व १० झोनमध्ये कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation launches another aggressive drive against tax defaulters

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : धात महापालिकेने गुरुवारी (दि. २५) शहरभर धडक विशेष मोहिमेत कारवाई करत १५ मालमत्ता सील केल्या. तर या मोहिमेद्वारे एका दिवसात तब्बल १ कोटी ९ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला. मागील आठवड्यातील मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

महापालिकेने मालमत्ता कर वसुलीवर भर दिला असून मागील आठवड्यातील मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर गुरूवारी पुन्हा विशेष मोहिम राबवण्यात आली. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपायुक्त विकास नवाळे यांनी सर्व १० झोनमधील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून संबंधित पथकांना कारवाईचे निर्देश दिले होते.

त्यानुसार झोननिहाय पथकांनी दिवसभर वसुली मोहीम राबवित थकबाकीदारांवर कारवाई केली. यात झोन १ मध्ये २ लाख ३८ हजार रुपये कर वसूल करण्यात आला. झोन २ मध्ये दोन मालमत्ता सील करून १८ लाख ६१ हजार रुपयांची वसुली झाली. झोन ३ मधून ६ लाख ६३ हजार रुपये, तर झोन ४ मध्ये पाच मालमत्ता सील करून ८ लाख ६१ हजार रुपयांचा कर जमा करण्यात आला. तसेच झोन ५ मधून ६ लाख ६३ हजार रुपये वसूल करण्यात आले.

झोन ६ मध्ये एक मालमत्ता सील करून ७ लाख २१ हजार रुपये जमा झाले. तर झोन ७ मध्ये दोन मालमत्ता सील करून ९ लाख ४३ हजार रुपयांची वसुली झाली. यात झोन ८ मध्ये एका मालमत्तेवर सीलची कारवाई करत ७लाख ६ हजार रुपये वसूल करण्यात आले. यासह झोन ९ मध्ये दोन मालमत्ता सील करून सर्वाधिक २८ लाख ८० हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला.

तर झोन १० मध्ये दोन मालमत्तांवर कारवाई करून ९ लाख २१ हजार रुपये जमा करण्यात आले. या मोहिमेत एकूण १५ मालमत्ता सील करण्यात आल्या असून १ कोटी ९ लाख रुपयांची कर वसुली करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली. थकबाकीदारांविरोधातील ही मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT