Pradhan Mantri Awas Yojana : घरकुल अनामत रकमेकरिता मनपाकडून ४ जूनपर्यंत मुदतवाढ file photo
छत्रपती संभाजीनगर

Pradhan Mantri Awas Yojana : घरकुल अनामत रकमेकरिता मनपाकडून ४ जूनपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री आवास योजनेला लाभार्थ्यांचा वाढता प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation extends deadline for housing deposit till June 4

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांसाठी दहा टक्के अनामत रक्कम भरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली असून लाभार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता अनामत रक्कम भरण्यासाठी ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.२२) मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेच्या वतीने हसूल, सुंदरवाडी, पडेगाव तसेच तिसगाव येथील दोन प्रकल्पांसह एकूण पाच ठिकाणी ११ हजार १२० घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. संबंधित ठिकाणी कंत्राटदारांकडून प्रत्यक्ष कामांना वेग देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात सुमारे साडेचार हजार लाभार्थी पात्र ठरले आहेत.

या लाभार्थ्यांना दहा टक्के अनामत रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच महापालिकेने विविध ठिकाणी मेळावे घेऊन लाभार्थ्यांना कर्जप्रक्रिया व इतर आवश्यक बाबींमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर योजन 'ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान हसूल येथे १११, पडेगावमध्ये १२३, सुंदरवाडीत सर्वाधिक ५४८, तिसगाव (२२५/१) येथे १३८ आणि तिसगाव (२२७/१) येथे १३९ लाभार्थ्यांनी अनामत रक्कम जमा केली आहे. अशा प्रकारे एकूण हजार ५९ लाभार्थ्यांनी रक्कम भरली आहे. अनामत रक्कम भरण्याची मुदत शुक्रवारी संपत् असताना महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी लाभार्थ्यांच्य सोयीसाठी ४ जूनपर्यंत मुदतवा देण्याचा निर्णय घेतला आहे. य कालावधीत पात्र लाभार्थ्यांनी दह टक्के रक्कम जमा करावी, असे आवाहन उपायुक्त अपर्णा थेटे यांनी केले आहे.

नवीन अर्जानाही प्रतिसाद

प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ६२३ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पडेगावसाठी ११६, सुंदरवाडीसाठी २६४, तिसगावच्या दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी ३२ तर हर्मूलसाठी १७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी यावेळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT