Illegal Plotting : देवस्थानच्या जमिनीवरील अवैध प्लॉटिंगवर मनपाचा हातोडा file photo
छत्रपती संभाजीनगर

Illegal Plotting : देवस्थानच्या जमिनीवरील अवैध प्लॉटिंगवर मनपाचा हातोडा

४१ एकरांवर ८१० प्लॉटचे अनधिकृत ले-आऊट उद्ध्वस्त : ७० टक्के भूखंडांची विक्री झाल्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation cracks down on illegal plotting on temple trust land

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा देवस्थानच्या मालकीची आणि वर्ग-२ स्वरूपाची जमीन असतानाही तब्बल ४१ एकर क्षेत्रावर अनधिकृत ले-आऊट टाकून ८१० भूखंडांची आखणी करण्यात आल्याचा प्रकार महापालिकेच्या कारवाईत उघडकीस आला.

आंबेडकरनगर रोडवरील सनी सेंटरच्या मागील गट क्रमांक १२४ व १२५ मधील या अनधिकृत प्लॉटिंगवर बुधवारी (दि. ३०) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी चालवून रस्ते, प्लॉटच्या हद्दी आणि मार्किंग जमीनदोस्त केले. विशेष म्हणजे, यातील सुमारे ७० टक्के भूखंडांची विक्री झाल्याची माहितीही समोर आली आहे.

जाधववाडी बाजार समितीच्या समोरील भागात सनी सेंटरच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्लॉटिंग सुरू असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. तब्बल ४१ एकर क्षेत्रावर चुना व दगडांच्या साह्याने प्लॉटची आखणी करून ८१० भूखंडांच्या हद्दी निश्चित केल्याचे निदर्शनास आले.

त्यावरून महापालिका पथकाने जमिनीच्या सातबारा उताऱ्याची तपासणी केली. यात संबंधित जमीन श्रीराम मंदिर संस्थान, बालाजी मठ यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. तसेच जमीन वर्ग-२ स्वरूपाची असल्याचे आढळले. त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा ले-आऊट विकसित करून भूखंडांची विक्री करण्याचा प्रकार अधिक गंभीर असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

दरम्यान, महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साह्याने या जमिनीवरील प्लॉटच्या हद्दी, अंतर्गत रस्त्यांच्या खुणा यासह करण्यात आलेले मार्किंग उखडून टाकण्यात आले. या कारवाईमुळे अनधिकृत ले-आऊटच्या माध्यमातून भूखंड विक्री करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

या जागेवरील सुमारे ७० टक्के भूखंडांची विक्री झाल्याची माहिती समोर आली असून, या व्यवहारामागे काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचेही अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात देसाई व नागरी मित्र पथकातील जवान या कारवाईत सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT