Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : 'त्या' ३४ नगरसेवकांच्या अपात्रेतची फाईल उघडणार

मनपा आयुक्त घेणार निर्णय; तिसरे आपत्य, अतिक्रमणासह इतर तक्रारींचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Municipal Commissioner to take a decision; includes complaints regarding encroachments and other issues

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तिसरे अपत्य, अतिक्रमण, शपथपत्रात चुकीची माहिती देणे, अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणे यासह इतर तक्रारींवरून ३४ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे मागील महिनाभरापासून या प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला होता. परंतु आता पुन्हा ही फाईल उघडून पुढील प्रक्रिया सुरू केली जणार असल्याचा इशारा शुक्रवारी (दि.३) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिला.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणुका होऊन आता ५ महिने लोटले आहेत. परंतु अजूनही नगरसेवकांच्या विरोधात पराभूत उमेदवारांच्या तक्रारी सुरूच आहेत. बेकायदा बांधकामे, तिसरे अपत्य, निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती देणे यासह अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध यावरून ३४ नगरसेवकांविरोधात महापालिका आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात अनेकांनी पुरावेही महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे सदर केली आहेत.

काहींनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींवर कारवाईचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार मागील तीन महिन्यांपासून प्रक्रिया सुरूच आहे.

त्यात संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे एक महिन्यापासून प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला होता. मात्र निवडणूक संपून दोन आठवडे उलटले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त येडगे यांनी या प्रक्रियेला पुढे सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा दिला असून, लवकरच ही फाईल उघडण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सर्वाधिक एमआयएमचे नगरसेवक

यात सर्वाधिक तक्रारी या एमआयएमच्या नगरसेवकांविरोधात प्राप्त झाल्या आहेत. त्यात तिसरे अपत्याबाबतच्या सुमारे १६ हून अधिक तक्रारी आहेत. तर अतिक्रमण आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केल्याबाबत १२ नगरसेवकांविरोधात तक्रारी आहेत. शिवाय यात भाजपच्या ४ आणि शिवसेनेच्या २ नगरसेवकांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT