Siddharth Udyan News : सिद्धार्थ उद्यानात टवाळखोरांचा उच्छाद File Photo
छत्रपती संभाजीनगर

Siddharth Udyan News : सिद्धार्थ उद्यानात टवाळखोरांचा उच्छाद

उद्यान सायंकाळी सहा वाजता बंद करण्याचा महापालिका प्रशासकांचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Municipal administrators decide to close Siddharth Udyan at 6 pm

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यासह विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात टवाळखोरांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला असून, सुरक्षारक्षकांसोबतही अरेरावी करीत आहे. दररोज होणारे वाद टाळण्यासाठी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशावरून सिद्धार्थ उद्यानाची वेळ एक तासाने कमी करून सायंकाळी ६ वाजता बंद करण्याचा निर्णय गुरुवारी (दि.४) घेण्यात आला.

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आहे. मराठवाड्यातील एकमेव हे प्राणिसंग्रहालय असल्यामुळे मराठवाड्यासह विविध भागातून पर्यटक, सहली, बालगोपाळ, तरुण मंडळी उद्यानात येत असतात. येथे आल्यानंतर प्राणिसंग्रहालयातील मुख्य आकर्षण असलेले सिंह, वाघ, बिबट्या, हरीण, नीलगाय, सांबर, कोल्हा, माकड या प्रमुख प्राण्यांसह सर्पालय, मच्छालयालाही भेटी देतात. त्यामुळे उद्यानासह प्राणिसंग्रहालयात दुपारनंतर प्रचंड गर्दी उसळते.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र उद्यानात येत अस लेले पर्यटक त्यांच्या सूचनांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. यात प्रामुख्याने १५ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींचा समावेश असतो. तसेच टवाळखोरही सांयकाळनंतर विनाकारण पर्यटकांशी हुज्जत घालतात, सुरक्षारक्षकांना अरेरावी करतात, त्यांच्या अंगावर धावून जातात, अश्लील हावभाव करतात, असे प्रकार घडत असल्याने त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही करण्यात आली.

त्यावरून पोलिस व दामिनी पथकही दररोज गस्त घालतात. मात्र पोलिस निघून गेल्यानंतर टवाळखोर पुन्हा सुरक्षारक्षकांशी वाद घालतात. दररोज होणारे हे प्रकार लक्षात घेऊन उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी उद्यानाची वेळ एक तास कमी करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्याकडे सादर केला होता. त्याला प्रशासकांनी मंजुरी दिल्याने आता सायंकाळी सातऐवजी सहा वाजताच उद्यान बंद केले जाणार आहे.

भिंत ओलांडून करतात उद्यानात प्रवेश

उद्यानाच्या मागील बाजूस जलतरण तलाव आहे. या तलावाच्या प्रवेशद्वारावरुन तसेच दादागिरी करुन हे टवाळखोर उद्यानात प्रवशे करतात. उद्याना लगतच्या काही वसाहतींमधील हे टवाळखोर असल्याची चर्चा आहे.

६ वाजता तिकीट विक्री बंद

उद्यानात दररोज सायंकाळी टवाळखोरांकडून केले जाणारे प्रकार टाळण्यासाठी प्रशासकांनी उद्यान बंद करण्याची वेळ एक तासाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हिवाळ्यात दिवस लवकर मावळत असल्यामुळे रात्री ७ ऐवजी सायंकाळी ६ वाजता तिकीट विक्री बंद करून उद्यान पूर्णपणे बंद केले जाणार आहे. उन्हाळ्यात रात्री ७ वाजता बंद करण्यात येईल, असे उद्यान प्रशासनाकडून स्पष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT