https://www.youtube.com/watch?v=TXLn1nOflrg file photo
छत्रपती संभाजीनगर

MP Sanjay Jadhav : शिवसेना संपविण्याची सुपारी राऊतांनी घेतली

मंठा येथील शिवसेना संवाद बैठकीत खा. संजय जाधव यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

MP Sanjay Jadhav alleged that Sanjay Raut worked to destroy the Shiv Sena

मंठा, पुढारी वृत्तसेवा : बेताल बडबड करून संजय राऊतांनी शिवसेना संपवायचे काम केले असून शिवसेना संपविण्याची सुपारीच त्यांनी घेतली असा आरोप खा. संजय जाधव यांनी केला. परभणी लोकसभा मतदार संघातून २०२४ ची निवडणूक मशालीवर लढलो असलो तरी आपला जन्म धनुष्यबाणात झालाय आणि शेवट धनुष्यबाणातच होणार अशी ग्वाही खा. जाधव यांनी दिली.

मंठा येथे रविवारी (दि.२८) रोजी गजानन मंगल कार्यालयात मंठा -परतूर - नेर - सेवली मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) संवाद बैठकीत खा. जाधव बोलत होते. या बैठकीला परभणी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तथा शिवसेना उपनेते आनंदराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, प्रल्हादराव बोराडे, संतोष वरकड, किसनराव मोरे, तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे, सुदर्शन सोळंके, योगेश अवचार, सुनिता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खा. जाधव म्हणाले की, परतुर विधानसभा मतदारसंघाने मला वेळोवेळी प्रचंड सहकार्य केले मी त्यांचे ऋण कधीच विसरू शकत नाही. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्लाच राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशवाडी येथील दुर्घटनेमुळे खा. जाधव यांनी सत्कार स्वीकारला नाही.

आनंदराव जाधव म्हणाले की, शिवसेनेच्या सर्व बीएलए यांनी एसआयआर प्रक्रियेसाठी दक्ष राहिले तरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला भरघोस यश मिळेल अशी खात्री दिली. जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. अल्पमतांनी पराभव झाला असला तरी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व शिवसेना नेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे आगामी काळात त्यांना ताकद देतील असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एसआयआर पदाधिकाऱ्यांना प्रक्रियेबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेखर परदेशी यांनी प्रशिक्षण दिले. स्क्रीनवर सर्वांशी संवाद साधत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

मंठा येथील शिवसेना (शिंदे गट) संवाद बैठकीला शिवसेनेचे प्रल्हादराव खेडेकर, श्रीरंगराव खरात, केशव महाराज सरकटे, मधुकर काकडे, बाबाराव राठोड, संजय राठोड, वसंतराव राऊत, नगरसेवक अचित बोराडे, रामराव वरकड, कासाबाई शिरोळे, अॅड. राजेश खरात, भगवान गायकवाड, अक्षयदीप वाघमारे, पांडू बोराडे, डॉ. संतोष पवार, पांडू वैद्य, नितीन मोरे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बीएलए यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यकर्त्यानी कामाला लागावे : बोराडे

परतुर विधानसभा मतदारसंघातील जनतेला एका एका मताची किंमत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कळाली असल्यामुळे सर्व बीएलए जोमाने कामाला लागलेले आहेत. एसआयआर प्रक्रियेवर आपले बारकाईने लक्ष असून या प्रक्रियेत निष्काळजीपणा होता कामा नये अशी सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT