Sambhajinagar News : बंदला संमिश्र प्रतिसाद file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : बंदला संमिश्र प्रतिसाद

रिक्षासाठी भरउन्हात नागरिकांची पायपीट

पुढारी वृत्तसेवा

Mixed response to the shutdown; Citizens queue for rickshaws in the scorching heat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एलपीजीचे वाढते दर तात्काळ घटवा, रिक्षांना दरवाढ द्या तसेच शहरात विविध ठिकाणी रिक्षास्टँड द्यावे यासह इतर मागण्यांसाठी रिक्षा संघटनेच्या वतीने सोमवार (दि.३०) बंद पाळला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही रिक्षाचालक संघटनांनी याला विरोध दर्शवला होता, परंतु हल्ले होतील या भीतीने अनेकांनी रिक्षा रस्त्यावर उतरवल्या नाहीत. तर अनेकांच्या रिक्षा प्रवासी वाहतूक करत होत्या. रिक्षा बंद असल्यामुळे नागरिकांना भरउन्हात पायपीट करावी लागली.

रिक्षा दैनंदिन वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी बंद पाळला. यात काही संघटना सहभागी झाल्या, तर काही संघटनांनी विरोध केला. विरोध करणाऱ्या संघटनांच्या रिक्षा रस्त्यावर दिसताच त्यांना अडवून दम देण्यात येत होता. त्यामुळे अनेकांनी पुन्हा रिक्षा घरी लावल्या. तर अनेकांनी अशाही स्थितीत प्रवाशांना सेवा दिली. दरम्यान, बाहेरून शहरात आलेल्या प्रवाशांना रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथून पायपीट करावी लागली. तर कामांवर जाणारे किंवा शहरात नातेवाइकांकडे जाणाऱ्यांना मात्र स्वतःच्या वाहनांचा किंवा नातेवाइकांच्या मदतीने प्रवास केला.

शहरबस हाऊसफुल्ल

रिक्षा बंद असल्याने नागरिकांना शहर बसकडे वळावे लागले. दरम्यान, अचानक प्रवासी वाढल्याने बस खचाखच भरलेल्या होत्या. अनेक ठिकाणी प्रवाशांसाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याची वेळ आली.

प्रवाशांची पायपीट

महावीर चौकात बाहेरगावाहून येणाऱ्या बस थांबतात. येथून अनेकांना पायपीट करावी लागली तर अनेकांनी जास्त पैसे देऊन घर जवळ केले. रिक्षांची कमतरता असल्याने गरोदर माता, तान्ह्या बाळांसह प्रवास करणाऱ्या माता, वयोवृद्ध नागरिक, तसेच दिव्यागांना भर उन्हात पायपीट करावी लागली. अनेक जण डोक्यावर बॅगा, किंवा इतर साहित्य घेऊन जातांनाचे चित्र दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT