crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News: नशेसाठी पैसे कमी पडले; मंदिर फोडून देवाचे सोन्या-चांदीचे डोळेही चोरले

नशेची तलफ भागवण्यासाठी पैसे कमी पडल्याने एका अल्पवयीन मुलाने छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनगरातील मारुती मंदिर फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर : नशेची तलफ भागवण्यासाठी पैसे कमी पडल्याने एका अल्पवयीन मुलाने छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनगरातील मारुती मंदिर फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

मंदिरातील दानपेटी फोडून रोख रकमेसह मूर्तीचे सोन्या-चांदीचे डोळेही चोरल्याचा आरोप या मुलावर आहे. क्रांतीचौक पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासांत संशयिताला ताब्यात घेतले. यापूर्वीही त्याच्यावर अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

९ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता पुजारी उदय कुलकर्णी यांनी मंदिर नेहमीप्रमाणे बंद केले होते. मात्र, १० सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता मंदिरात पोहोचले असता, मागील चॅनेल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तातडीने पुजारी विवेक कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक रत्नपारखी, मयुरेश कोटणीस आणि इतर विश्वस्तांना माहिती दिली.

पाहणी केली असता, गेटचा कडी-कोंडा तुटलेला, तर लोखंडी सळईने दानपेटी फोडल्याचे आढळून आले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी तपास करत संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT