Siddhartha Udyan : सिद्धार्थ उद्यानातील मिनी ट्रेन थेट रुळावरून घसरली; तीन मुले जखमी file photo
छत्रपती संभाजीनगर

Siddhartha Udyan : सिद्धार्थ उद्यानातील मिनी ट्रेन थेट रुळावरून घसरली; तीन मुले जखमी

सिद्धार्थ उद्यानात बालगोपाळांना फिरण्यासाठी मिनी रेल्वे सुरू करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mini-train at Siddharth Garden derails; three children injured

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सिद्धार्थ उद्यानात बालगोपाळांना फिरण्यासाठी मिनी रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही मिनी ट्रेन शनिवारी (दि. २७) दुपारी रुळावरून घसरल्याने तीन मुले किरकोळ जखमी झाले. या अपघातानंतर चिमुकल्यांच्या पालकांनी एकच गोंधळ घातला. मात्र, प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत ट्रेन थांबविली.

शुक्रवारी मोहरम आणि शनिवार, रविवार नियमित सुटी असल्याने सिद्यार्थ उद्यानात चिमुकल्यांनी गर्दी केली आहे. शहरासह बाहेर गावाहूनही पर्यटक उद्यानात आले होते. सकाळपासूनच पालकांसमवेत मुले उद्यानात खेळण्यासाठी दाखल झाले. सिद्धार्थ उद्यानात लहान मुलांना फिरण्यासाठी मिनी रेल्वे सुरू करण्यात आली आहे.

या रेल्वेतून मुलांसह त्यांचे बहिण-भाऊ, आई-वडीलही फेरी मारतात. दोन दिवसापासून पाऊस होत असल्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. मिनी रेल्वेच्या रुळावरही पाणी साचले असून रेल्वेच्या वजनाने रुळ दबले जात आहे. शनिवारी दुपारी रेल्वेतून मुले चकर मारत असताना अचानक रेल्वे रुळावरून एका बाजूला कलंडल्या गेली. त्यामुळे तीन मुले किरकोळ जखमी झाले. रेल्वे रुळावरून घसरताच पालकांनी आरडा-ओरड करीत गोंधळ घातला. सुरक्षारक्षकांनी पालकांची समजूत घालत त्यांना शांत केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT