

The issue of waterlogging in the Shivajinagar subway has finally been resolved
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचून चिखल होत असल्याने वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर ठोस उपाययोजना केल्या आहेत. रेल्वे विभागाने पाईपलाईन दुरुस्त करून नव्याने बसविली असून, पाणी व चिखल उपसण्यासाठी मडपंपही बसविण्यात आले असल्याची माहिती बुधवारी (दि.१३) महापौर समीर राजूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिवाजीनगर भुयारी मार्गात पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने रस्त्यावर चिखल तयार होत होता. त्यामुळे दुचाकीस्वारांना घसरून अपघातात अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. अलीकडेच झालेल्या एका गंभीर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने रेल्वे, बांधकाम आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. तपासणीदरम्यान पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी टाकलेली पाईपलाईनमध्ये त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे पाणी योग्य मार्गाने न जाता थेट भुयारी मार्गात साचत होते. ही त्रुटी दूर करण्यासाठी रेल्वे विभागाने सुमारे ५०० मीटर लांबीची पाईपलाईन काढत योग्यपध्दतीने बसविली. यासोबतच, साचलेले पाणी आणि चिखल त्वरित बाहेर काढण्यासाठी मडपंप बसविण्यात आला आहे.
वाहतूक सुरळीत होण्याचा विश्वास
या सुधारित यंत्रणेमुळे भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अपघातांना आळा बसेल, असा विश्वास महापौर समीर राजूरकर यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना महत्त्वाची ठरणार असून, आगामी पावसाळ्यात परिस्थिती नियंत्रणात राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत