MIM office-bearers create a ruckus in Naregaon over the SIR issue
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एसआयआर प्रक्रियेनंतर मतदार याद्यांमध्ये समाविष्ट झालेल्या नावांवर आक्षेप घेत अनेकांनी फॉर्म नंबर ७ दाखल केले आहेत. परंतु, या फॉर्ममुळे आमची नावे यादीतून कापली जाईल, अशी अफवा पसरताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी नारेगाव येथील महापालिकेच्या शाळेत जाऊन गोंधळ घातला.
तसेच एसआयआरचे काम करणाऱ्या बीएलओंना दस्ताऐवज जाळण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी (दि. १२) दुपारी घडला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाऊन सविस्तर माहिती दिल्यानंतर वाद निवळला.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार यादीच्या पडताळणीचे काम सुरू आहे. यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ज्यांची नावे वगळली आहेत, त्या मतदारांना फॉर्म ६ अर्ज भरून द्यायचा आहे. तर जी नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यावर फॉर्म नंबर ७भरून आक्षेप घेण्यात येत आहेत. निवडणूक विभागाला जी नावे आढळून आली नाहीत.
त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अंतिम टप्प्यात आले आहे. या आक्षेप घेण्यावरूनच सध्या काही वसाहतींमध्ये वादंग सुरू आहेत. मुस्लिमबहुल भागात प्रामुख्याने फॉर्म ७ ची आफवा पसरविण्यात येत आहे. एक-एक जण १० ते २० फॉर्म ७भरून देत मुस्लिमबांधवांच्या नावांवर आक्षेप घेत आहेत. त्यावरून निवडणूक विभाग मतदार यादीतून नावे वगळत असल्याचीही आफवा पसरविली जात आहे.
दरम्यान, नारेगावमध्ये याच कारणावरून एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील काही नागरिकांनी महापालिकेची शाळा गाठली. तेथे एसआयआरचे काम करणाऱ्या बीएलओंना आमची नावे मतदार यादीतून कपात का करीत आहेत, कागदपत्रे दाखवा नसता रेकॉर्ड जाळू, अशी धमकी देखील दिली. या घटनेची माहिती मिळताच निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना घटनेची माहिती दिली.
त्यावरून पोलिस निरीक्षक गणपत राहिरे घटनास्थळी दाखल झाले. तसेच तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्यासह अधिकाऱ्यांनी नारेगावमध्ये धाव घेत एमआयएम पदाधिकारी-कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यांना प्रक्रिया सविस्तर सांगितल्यानंतर वाद निवळला. तर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शारेक नक्षबंदी, विकास एडके, शाकेर खान, हाजी कुरैशी यांनी उपजिल्हाधिकारी चौधर यांना निवेदन दिले.
हरकतीनंतर सुनावणी घेणार ज्या ज्या मतदारांच्या नावावर आक्षेप घेतले जाणार आहेत. त्या-त्या मतदारांना सुनावणीचे पत्र पाठविण्यात येईल. आक्षेप येताच मतदार यादीतून नाव गळले जाणार नाही. तसे होत नाही, असे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर वाद निवळला.- नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी
निवडणूक विभागाकडे तक्रार नारेगावात एक-एक जण १५ ते २० फॉर्म नंबर ७दाखल करीत आहेत. प्रत्यक्षात हे अर्ज दाखल करण्याबाबत मर्यदा ठरवून दिली आहे. परंतु, असे असतानाही चुकीचा प्रकार सुरू होता. त्यामुळे एमआयएम पदाधिकारी व कार्यकर्ते नारेगाव मनपा शाळेत गेले होते. तर आम्ही निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांच्याकडे तक्रार दिली आहे.समीर साजेद बिल्डर, विरोधी पक्ष नेता, एमआयएम