मतीन शेखच्या घरासह तिन्ही मालमत्तांवर दुसरी २४ तास मुदतीची नोटीस चिटकविताना महापालिकेचे कर्मचारी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar news : मतीन शेखच्या घरावर आज चालणार बुलडोझर ?

स्थगितीला खंडपीठाचा नकार, मनपाने बजावली २४ तासांची अंतिम नोटीस

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचा आश्रयदाता एमआयएम नगरसेवक मतीन शेखच्या अडचणी आता वाढल्या आहेत. महापालिकेने नारेगाव येथील त्याच्या अनधिकृत मालमत्तांना नोटीस चिटकावून मालकी हक्काचे कागदपत्र सादर करण्यास ३ दिवसांची मुदत दिली होती. परंतु, या नोटीसला खंडपीठात आव्हान देत त्याने स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दर्शविला आहे. तर दुसरीकडे मुदत संपल्याने महापालिकेने २४ तासांची अंतिम नोटीस बजावल्याने आज पाडापाडी होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक येथील निदा खान हिला आश्रय दिल्याबद्दल पोलिसांनी एमआयएम नगरसेवक मतीन शेखवर गुन्हा नोंदविला. या घटनेपासून शेख मतीन गायब आहे. तो नेमका कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही. मात्र, महापालिका प्रशासनाने आता मतीन शेखची पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केली आहे.

मतीनच्या नारेगाव येथील अनधिकृत मालमत्तांचा शोध घेत महापालिकेने त्या सर्व मालमत्तांना नोटीस बाजावली. तसेच पहिल्या तीन दिवसांच्या नोटिसांची मुदत मंगळवारी संपणार होती. परंतु, त्यापूर्वीच मतीनने खंडपीठात धाव घेत महापालिकेच्या नोटीसला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, खंडपीठाने ही स्थगिती देण्यास नकार दर्शविला.

दरम्यान, मतीनच्या या सर्व मालमत्तांचे बांधकाम हे अनधिकृत आहे. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामांना महापालिकेने नोटीस बजावली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेने मंगळवारी पहिल्या नोटीसची मुदत संपल्याने दुसरी २४ तास मुदतीची अंतिम नोटीस बजावली आहे.

ही नोटीस मतीनच्या तिन्ही मालमत्तांवर चिटकविली असून त्यात २४ तासांत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले आहे. नसता महापालिका कारवाई करून त्यावर होण ारा खर्च वसूल करेल, असे नमूद आहे. तिन्ही मालमत्तांची गुंठेवारी केली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी मतीनच्या तिन्ही मालमत्तांवर बुलडोझर चालणार असल्याची शक्यता आहे.

कारवाईची लगबग

महापालिकेकडून मतीनच्या मालमत्तांवर कारवाई तर केली जाणार हे निश्चित आहे. ही कारवाई करताना कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्तांसोबत चर्चा करून कारवाईचा कालवधी निश्चित केला आहे. आता ही कारवाई आज होणार की उद्या, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT