संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकतेचा संदेश file photo
छत्रपती संभाजीनगर

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकतेचा संदेश

प्रथमच ढोल-ताशांच्या गजरात सेवा गर्जनेने सादरीकरण

पुढारी वृत्तसेवा

Message of unity on the occasion of the birth anniversary of Sant Sevalal Maharaj

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महानायक फाउंडेशनच्या वतीने सेव-जिनमोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त वसंतराव नाईक चौकात ढोल-ताशा पथकांच्या वतीने मानवंदना, सेवागर्जना तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमामध्ये एमआयटी महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या पथकाचे प्रभावी व शिस्तबद्ध सादरीकरण केले. ढोल-ताशांच्या गजरात स्वप्नील चव्हाण नाईक (संस्थापक अध्यक्ष : महानायक फाउंडेशन) व सुमित पवार यांनी सेवागर्जनेचे सादरीकरण करीत संत सेवालाल महार-ाजांना भावपूर्ण मानवंदना अर्पण केली.

यावेळी परिसर पूर्णपणे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला होता. संत सेवालाल महाराज यांच्या सेवाभाव, त्याग आणि समाजएकतेचा संदेश या सेवागर्जनेतून समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे स्वप्नील चव्हाण व सुमित पवार यांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस् वीतेसाठी अभिषेक चव्हाण, सुजल चव्हाण, नितेश राठोड, अजय राठोड, अविनाश जाधव, आकाश पवार, आदित्य रगडे, गौरव जाटवे, करण चव्हाण, समीर पठाण, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास युवक, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यापीठात अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि.१५) अभिवादन कार्यक्रम पार पडला. मुख्य इमारतीत आयोजित या कार्यक्रमास कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. बीना हुंबे, परीक्षा मंडळ संचालक डॉ. बी. एन. डोळे, विद्यार्थी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. विकास मंडळ संचालक कैलास आंभुरे, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा, डॉ. भास्कर साठे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT